उत्तर प्रदेशातील लखनौ येथे उत्तर प्रदेश वैश्विक गुंतवणूक शिखर परिषदेतील प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 19th, 03:00 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, देश-परदेशातून आलेले औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी आणि माझ्या परिवारातील सदस्य! आज आपण इथे विकसित भारतासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्मितीचा संकल्प करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आणि मला असे सांगण्यात आले की, आत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याबरोबर उत्तर प्रदेशातील 400 पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातील लक्षावधी लोक या कार्यक्रमाबरोबर जोडले गेले आहेत. जे लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचेही मी अगदी मनापासून स्वागत करतो. 7-8 वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी निर्माण होण्याविषयी असे वातावरण तयार होईल. त्या काळामध्ये जर कोणी म्हणाले असते की, उत्तर प्रदेश विकसित राज्य बनेल, तर कदाचित ते कोणी ऐकूनही घेतले नसते. त्यामुळे यावर कोणी विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. परंतु आज पहा, लक्षावधी कोटी रूपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये केली जात आहे आणि मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. माझ्या उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी असे काही चांगले घडते, त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होतो. आज हजारो प्रकल्पांवर काम सुरू होत आहे. कारखान्यांची उभारणी केली जात आहे. हे सर्व उद्योग सुरू होत आहेत, त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशचे चित्रच बदलून जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांचे आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील सर्व युवकांचे मी आज विशेष अभिनंदन करतो.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला केले संबोधित

February 19th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला संबोधित केले. उत्त‍र प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद - 2023 च्या चौथ्या कार्यक्रमामध्‍ये राज्यासाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मंजूर झालेल्या 14000 प्रकल्पांचा प्रारंभ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकल्पांमध्‍ये उत्पादन, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण आणि मालमत्ता, आदरातिथ्‍य, मनोरंजन आणि शिक्षण यांच्यासह इतर क्षेत्रांमधील उद्योग व्यवसायांचा समावेश आहे.

देहराडून इथे उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 08th, 12:00 pm

उत्तराखंड चे गव्हर्नर श्री गुरमीत सिंह जी, इथले लोकप्रिय आणि युवा मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धायमी, सरकारमधील मंत्री, विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योग जगतातील मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, देवभूमी उत्तराखंड इथे येऊन मनाला धन्यता वाटते. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा अचानक माझ्या तोंडातून निघालं होतं, की एकविसाव्या शतकातील हे तिसरं दशक, उत्तराखंडचे दशक आहे. आणि मला आनंद आहे, की माझ्या ह्या नळकत बोललेल्या शब्दांना प्रत्यक्षात साकार होतांना मी सातत्याने बघतो आहे. उत्तराखंडच्या या गौरवाशी आपण सगळे ही जोडले जात आहात, उत्तराखंडच्या विकासाच्या यात्रेचा भाग होण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरकाशी इथे बोगद्यात अडकलेल्या आमच्या श्रमिक बांधवांना सुरक्षित काढण्यासाठी जे यशस्वी अभियान चालवले गेले, त्यासाठी मी राज्य सरकार सहित, सर्वांचे विशेष अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी ‘उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023’ चे केले उद्‌घाटन

December 08th, 11:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत होत असलेल्या उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 चे उद्‌घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांनी सशक्त उत्तराखंड नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले आणि हाऊस ऑफ हिमालयाज या ब्रँडचे उद्‌घाटन केले. ‘पीस टू प्रॉस्पेरिटी’(शांततेतून समृद्धीकडे) ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर रोजी डेहराडून येथे भेट देणार

December 06th, 02:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर 2023 रोजी उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे भेट देणार आहेत. सकाळी 10:30 वाजता ते डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित 'उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023', अर्थात उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्‌घाटन करतील. या कार्यक्रमाला ते संबोधितही करतील.

उत्तर प्रदेश रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

February 26th, 12:01 pm

या दिवसांमध्ये रोजगार मेळावे माझ्यासाठी एक प्रमुख कार्यक्रम बनले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून मी बघत आहे की प्रत्येक आठवड्याला भाजपा -शासित कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये रोजगार मेळावे होत आहेत, हजारो युवकांना रोजगार नियुक्तीपत्र दिले जात आहेत. मला याचा आनंद आहे की मला त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळत आहे. हे प्रतिभावंत युवक सरकारी यंत्रणेत नवीन विचार घेऊन येत आहेत, कार्यक्षमता वाढवण्यात मदत करत आहेत.

उत्तरप्रदेशातील रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 26th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या मेळाव्यात, उत्तरप्रदेशात पोलिसांत उपनिरीक्षकांच्या थेट भरतीसाठी आणि नागरीक पोलिस, प्लाटून कमांडर तसेच अग्निशमन विभागातील दुय्यम अधिकारी अशा समकक्ष पदांसाठी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येथे आयोजित जागतिक गुंतवणुकदार संमेलन 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 10th, 11:01 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, ब्रजेश पाठकजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि इथले लखनौचे प्रतिनिधी राजनाथ सिंहजी, विविध देशांमधून आलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर, उत्तर प्रदेशचे सर्व मंत्री आणि जागतिक गुंतवणूकदार संमेलनासाठी उपस्थित उद्योग क्षेत्रातील आदरणीय सदस्य, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार, धोरणकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज आणि बधु भगिनिंनो!

लखनौ येथे उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

February 10th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथे जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि इन्व्हेस्ट यूपी 2.0 चा शुभारंभ केला. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 ही उत्तर प्रदेश सरकारची प्रमुख गुंतवणूक परिषद असून, ही परिषद धोरणकर्ते, औद्योगिक क्षेत्रातील नेते, शिक्षण तज्ञ, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रितपणे व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एकत्र आणणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

पंतप्रधान येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचा दौरा करणार

February 08th, 05:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी दहा वाजता, पंतप्रधान लखनौला जातील, तिथे त्यांच्या हस्ते , उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्‌घाटन होईल. सुमारे, पावणेतीन वाजता, पंतप्रधान मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. तसेच, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर सुमारे साडे चार वाजता पंतप्रधान मुंबईतच अल्जामिया-तुस-सैफीयाच्या नव्या परिसराचेही उद्‌घाटन करतील.

मध्य प्रदेश के इंदौर में मध्य प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स समिट 2023 में प्रधानमंत्री के वीडियो संदेश का मूल पाठ

January 11th, 05:00 pm

मध्य प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेसाठी सर्व गुंतवणूकदार,उद्योजक यांचे खूप-खूप स्वागत ! विकसित भारत घडवण्यामध्ये मध्य प्रदेशाची महत्वाची भूमिका आहे. भक्ती, अध्यात्मापासून ते पर्यटन, कृषी शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत मध्यप्रदेश आगळा,अद्भुत आणि सजगही आहे.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 ला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित

January 11th, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाद्वारे मध्य प्रदेशातील इंदूर येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेत मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या विविध संधींचे दर्शन घडणार आहे.

धरमशाला , हिमाचल प्रदेश येथे जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 07th, 04:04 pm

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, मुख्यमंत्री जयराम ठाकूरजी, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद पटेलजी, अनुराग ठाकुरजी, नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमारजी, यूएईचे भारतातील राजदूत डॉक्टर अहमद अलबाना, उद्योग जगतातील दिग्गज उद्योगपती, येथे उपस्थित अन्य मान्यवर आणि माझे प्रिय सहकारी. धरमशाला येथे जागतिक गुंतवणूकदार परिषद ही कल्पना नाही, सत्य आहे, अभूतपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे. तुमचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशाचा साऱ्या देशाला, साऱ्या जगाला हा दावा आहे की आम्ही आता तयार आहोत.

धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

November 07th, 11:22 am

उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे.

ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्‌घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन

February 03rd, 02:10 pm

आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.

ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 03rd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्‌घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

आसामच्या जागतिक गुंतवणुक परिषद २०१८ च्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधानांचे उद्या संबोधन

February 02nd, 06:46 pm

पंतप्रधान, नरेंद्र मोदी आसाम येथील गुवाहाटीमध्ये आयोजित जागतिक गुंतवणूक परिषद २०१८ च्या उद्घाटन समारंभाला उद्या संबोधित करतील.

झारखंडमधल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार शिखर परिषद 2017 ला पंतप्रधानांच्या शुभेच्छा

February 16th, 12:24 pm

PM Narendra Modi has extended best wishes to the Global Investors' Summit 2017 in Jharkhand. Investment generated from Invest Jharkhand will create several opportunities for people of the state and give wings to their aspirations. Skills and determination of people of Jharkhand and proactive efforts of Jharkhand Government are bringing record development in the state., the PM said.