कोविड संदर्भातील दुसऱ्या जागतिक आभासी शिखर परिषदेच्या उद्‌घाटनपर सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 12th, 08:58 pm

कोविड महामारीमुळे मानवी जीवन आणि पुरवठा साखळ्या यांच्यात अडचणी निर्माण होणे सुरुच आहे आणि त्यासोबतच मुक्त समाजाच्या सहनशक्तीची देखील परीक्षा घेतली जात आहे. भारतात, आपण या महामारीविरुद्ध लोकाभिमुख धोरण स्वीकारले आहे. या वर्षीच्या आमच्या वार्षिक आरोग्यसेवेच्या तरतुदीसाठी आम्ही आतापर्यंतचा आरोग्य क्षेत्रासाठीचा सर्वात जास्त निधी राखून ठेवला आहे.

दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये पंतप्रधान सहभागी

May 12th, 06:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये सहभाग घेतला. या परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात पंतप्रधानांनी 'महामारीमुळे आलेला थकवा टाळणे आणि तयारीला प्राधान्य' या विषयावर भाषण केले.