दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 20th, 10:45 am

कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य किरेन रिजिजूजी, किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, मीनाक्षी लेखीजी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, देश-परदेशातून या ठिकाणी आलेले आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व आदरणीय भिक्षू, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो,

नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

April 20th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.

भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि आपल्या भाषणांचे संकलन असलेली पीआयबी ची पुस्तिका पंतप्रधानांनी शेअर केली

April 19th, 08:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता नवी दिल्ली इथे जागतिक बौद्ध शिखर परिषदेला संबोधित करतील.

20 एप्रिलला होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित

April 18th, 10:58 am

दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी हॉटेल अशोक येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचा विषय आहे-“ समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास”. बौद्ध धम्म आणि जागतिक समस्यांबाबत जागतिक पातळीवरील बौद्ध धम्मामधील नेतृत्व आणि विद्वान यांच्यात परस्परसंवाद घडवून आणण्याच्या आणि एकत्रितपणे त्यावर तोडगे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचे अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्माची मूलभूत मूल्ये समकालीन घडामोडींमध्ये कशा प्रकारे प्रेरक आणि मार्गदर्शक ठरू शकतात यावर शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. जगभरातील मान्यवर विद्वान, महासंघ नेते आणि धम्म अनुयायी या परिषदेत सहभागी होणार आहेत आणि ते जागतिक मुद्यांवर चर्चा करतील आणि त्याबाबत सार्वत्रिक मूल्यांवर आधारित असलेल्या बौद्ध धम्मामध्ये उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील. ही चर्चा प्रामुख्याने चार विषयांवर आयोजित करण्यात येईल. पर्यावरणीय संकट, आरोग्य आणि शाश्वतता, नालंदा बुद्धिस्ट परंपरेचे जतन, बौद्ध धम्म तीर्थयात्रा, परंपरागत वारसा आणि बुद्धांचे अवशेषः दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशियायी देशांशी भारताच्या अनेक शतके प्राचीन सांस्कृतिक संबंधांचा एक मजबूत पाया.