उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 07th, 04:00 pm
पवित्र श्रावण महिना, भगवान इंद्राचा आशीर्वाद, शिवावतार गुरु गोरखनाथांचे तपस्थळ आणि अनेक संतांचे कार्यस्थान असलेली ही गोरखपूरची गीताप्रेस . जेव्हा संतांचा आशीर्वाद फलदायी ठरतो, तेव्हा अशा मंगल प्रसंगाचा लाभ मिळतो. यावेळची माझी गोरखपूर भेट ही 'विकासाबरोबरच वारसाही' या धोरणाचे उत्तम उदाहरण आहे. मला नुकतेच सचित्र शिवपुराण आणि नेपाळी भाषेत शिवपुराण प्रकाशित करण्याचे भाग्य लाभले आहे. गीता प्रेसच्या या कार्यक्रमानंतर मी गोरखपूर रेल्वे स्थानकावर जाणार आहे. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे कामही आजपासून सुरू होणार आहे. आणि जेव्हापासून मी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत, तेव्हापासून लोक आश्चर्याने पाहत आहेत. रेल्वे स्थानकांचाही अशाप्रकारे कायापालट होऊ शकतो, असा विचारही लोकांनी केला नव्हता. आणि त्याच कार्यक्रमात मी गोरखपूर ते लखनौ या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. आणि त्याचवेळी जोधपूर ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला जाईल. वंदे भारत रेल्वेगाडीने देशातील मध्यमवर्गाला सुविधा आणि सोयींचें एक नवीन दालन खुले करून दिले आहे. एक काळ असा होता की आमच्या भागात या रेल्वेगाडीला किमान थांबा द्या, त्या गाडीला थांबा द्या, अशी पत्रे नेते लिहायचे. आज देशाच्या कानाकोपऱ्यातील नेते मला पत्र लिहून वंदे भारत आपल्या प्रदेशातूनही चालवा, अशी विनंती करतात. ही वंदे भारताची मोहिनी आहे. या सर्व घटनांसाठी मी गोरखपूरच्या जनतेचे आणि देशातील जनतेचे अभिनंदन करतो.उत्तर प्रदेशात गोरखपूर येथे गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
July 07th, 03:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर येथे ऐतिहासिक गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केले आणि चित्रमय शिव पुराण ग्रंथाचे प्रकाशन केले. गीता प्रेसमधील लीला चित्र मंदिराला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि भगवान श्री रामाच्या तसबिरीला फुले वाहून वंदन केले.पंतप्रधान 7-8 जुलै रोजी 4 राज्यांना भेट देणार ; सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार
July 05th, 11:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7-8 जुलै 2023 रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. तर 8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगण आणि राजस्थानला भेट देणार आहेत.गीता प्रेसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
May 03rd, 08:35 pm
गीता प्रेसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आध्यात्मिक वारसा देश-विदेशात घेऊन जाण्याचा प्रकाशकांचा शंभर वर्षांचा प्रवास अतुलनीय आणि अविस्मरणीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.