16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन
October 23rd, 05:22 pm
16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या शानदार आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन करतो.16 व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
October 23rd, 03:10 pm
ब्रिक्स नेत्यांनी बहुपक्षीयता बळकट करणे, दहशतवादाचा मुकाबला करणे, आर्थिक विकासाला चालना देणे, शाश्वत विकासाचा पाठपुरावा करणे आणि ग्लोबल साउथच्या समस्यांवर प्रकाश टाकणे यासारख्या मुद्यांवर फलदायी चर्चा केली. या नेत्यांनी 13 नवीन ब्रिक्स भागीदार देशांचे स्वागत केले.अहमदाबाद, गुजरात येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी/उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
September 16th, 04:30 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सी आर पाटील, देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमाशी संबंधित सर्व राज्यपाल, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधींनो आणि इथे मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
September 16th, 04:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथे 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते, वीज, गृहनिर्माण आणि वित्त क्षेत्रातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यापूर्वी आज मोदी यांनी अहमदाबाद आणि भूज दरम्यान भारतातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन केले. त्यांनी अनेक वंदे भारत ट्रेन्सना रवाना केले. यामध्ये नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी या रेल्वेगाड्या आणि वाराणसी ते दिल्ली या पहिल्या 20 डब्यांच्या वंदे भारत ट्रेन चा समावेश होता. त्याबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या एक खिडकी आयटी प्रणालीचा (SWITS) शुभारंभ केला.बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 19th, 03:15 pm
बेंगळुरूमध्ये परदेशातील सर्व आदरणीय पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. बेंगळुरू हे आकांक्षांना नवकल्पना आणि यशाची जोड देते आणि भारताच्या तांत्रिक क्षमतेला जागतिक मागणीशी संलग्न करते. ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी बेंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन जागतिक तंत्रज्ञान संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे संकुल अमेरिकेबाहेर बोईंग कंपनीची सर्वात मोठी सुविधा आहे, जे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक विमान वाहतूक बाजारालाही नवीन ऊर्जा देईल. पण मित्रांनो, या सुविधेचे महत्त्व इतकेच मर्यादित नाही. या सुविधेचे महत्त्व जागतिक तांत्रिक प्रगती, संशोधन, नवोन्मेष, संरचना आणि मागणी यांच्या पूर्ततेत भारताच्या वचनबद्धतेशी निगडित आहे. ते 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या आमच्या संकल्पाला बळ देते. शिवाय, या संकुलाची उभारणी ही भारताच्या प्रतिभेवर जगाचा विश्वास अधोरेखित करते. आजचा सोहोळा हा एक दिवस भारत या सुविधेत 'भविष्यातील विमान' डिझाइन करेल या विश्वासाचा आहे. म्हणून, मी संपूर्ण बोईंग व्यवस्थापन आणि सर्व हितधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो; आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन
January 19th, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन केले. 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधण्यात आलेले हे 43 एकर क्षेत्राचे संकुल बोइंगची अमेरिकेबाहेरची अशी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पंतप्रधानांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा देखील प्रारंभ केला ज्याचा उद्देश देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील जास्तीत जास्त मुलींच्या प्रवेशाला पाठबळ देणे हा आहे.गिफ्ट सिटी इथे झालेल्या जागतिक फीनटेक मंचावर पंतप्रधानांची उपस्थिती
January 10th, 10:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या गिफ्ट सिटी मध्ये आयोजित ग्लोबल फिनटेक मंचावर उपस्थित होते.गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2024 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 10th, 10:30 am
तुम्हां सर्वांना 2024 या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नजीकच्या भूतकाळातच भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आता भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीची शतकपूर्ती साजरी करेल तोपर्यंत भारताला विकसित रूप देण्याचे उद्दिष्ट आपण निश्चित केले आहे. आणि म्हणूनच, 25 वर्षांचा हा कार्यकाळ, भारतासाठी अमृतकाळ आहे. ही नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि नित्य-नव्या यशस्वी कार्यांचा काळ आहे. याच अमृतकाळात ही पहिली व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद होत आहे. आणि म्हणूनच या परिषदेचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. या परिषदेला उपस्थित राहिलेले 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, भारताच्या या विकास यात्रेचे महत्त्वाचे सहयोगी आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, तुमचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या हस्ते 10 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन
January 10th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे उद्घाटन झाले. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना, “भविष्यासाठीचा मार्ग” अशी असून त्यात, 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्थांचा सहभाग आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयासाठी एक व्यासपीठ म्हणूनही ह्या शिखर परिषदेचा वापर होत असून, त्याद्वारे ईशान्य भारत प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी उद्योजकांसमोर मांडल्या जात आहेत.पंतप्रधान 8 ते 10 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर
January 07th, 03:11 pm
नऊ जानेवारीला, सकाळी साडे नऊच्या सुमाराला, पंतप्रधान गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे पोहोचणार असून, तिथे जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, त्यानंतर आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत त्यांची बैठक होईल. दुपारी तीनच्या सुमाराला, पंतप्रधानांच्या हस्ते, व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शो चे उद्घाटन होईल.इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 09th, 11:09 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, राज्य सरकारचे मंत्री, आयएफसीए चे अध्यक्ष के. राजारामन जी, जगातील प्रतिष्ठित वित्तीय संस्था आणि विविध संस्थांचे नेते, महिला आणि पुरुष,पंतप्रधानांनी इन्फिनिटी फोरम 2.0 ला केले संबोधित
December 09th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत फिनटेकवरील जागतिक विचार नेतृत्व मंच असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पूर्वी एक विशेष कार्यक्रमाच्या रुपात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), आणि GIFT City यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नेतृत्वाखाली, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीची मुख्य संकल्पना 'GIFT-IFSC: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र' ही आहे.पंतप्रधान 9 डिसेंबर रोजी इन्फिनिटी फोरम 2.0 ला संबोधित करणार
December 07th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर 2023 तोजी सकाळी साडेदहा वाजता इन्फिनिटी फोरम या आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित जागतिक वैचारिक मंचाच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.पंतप्रधान 12 मे रोजी गुजरात दौऱ्यावर
May 11th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मे रोजी गुजरातला भेट देणार आहेत. गांधीनगर येथे अखिल भारतीय शिक्षक संघाच्या अधिवेशनात पंतप्रधान सकाळी 10:30 वाजता सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता गांधीनगर येथे सुमारे 4,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करतील. दुपारी 3 वाजता ते गिफ्ट सिटीला भेट देतील.GIFT City celebrates both wealth and wisdom: PM Modi
July 29th, 03:42 pm
PM Modi laid the foundation stone of the headquarters building of the International Financial Services Centres Authority (IFSCA) in GIFT City, Gandhinagar. The Prime Minister noted that GIFT City was making a strong mark as a hub of commerce and technology. GIFT City celebrates both wealth and wisdom, he remarked.PM lays foundation stone of IFSCA headquarters at GIFT City in Gandhinagar
July 29th, 03:41 pm
PM Modi laid the foundation stone of the headquarters building of the International Financial Services Centres Authority (IFSCA) in GIFT City, Gandhinagar. The Prime Minister noted that GIFT City was making a strong mark as a hub of commerce and technology. GIFT City celebrates both wealth and wisdom, he remarked.'विकासासाठी वित्तपुरवठा आणि आकांक्षी अर्थव्यवस्था' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण
March 08th, 02:23 pm
सर्वप्रथम, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिमानाची बाब म्हणजे आपण आज अर्थसंकल्पा संदर्भात चर्चा करत आहोत, तेंव्हा भारतासारख्या विशाल देशाच्या अर्थमंत्री देखील एक महिला आहेत, त्यांनी यावेळी देशाचा मोठा प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केला आहे.‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण
March 08th, 11:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलेले हे या प्रकारचे, दहावे वेबिनार होते.इन्फिनिटी फोरम 2021 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 03rd, 11:23 am
तंत्रज्ञान आणि आर्थिक विश्वातील माझे सहकारी नागरीक, आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले 70 देशांमधील हजारो नागरीक,इन्फिनिटी फोरम या फिनटेकसंबंधी वैचारिक नेतृत्व मंचाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
December 03rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फिनिटी फोरम या फिनटेकवरील वैचारिक नेतृत्व मंचाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.