पंतप्रधानांनी वाहिली आर्य समाजाच्या स्मारकाला आदरांजली
November 22nd, 03:09 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयाना येथील जॉर्जटाऊन मधील,आर्य समाज स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.गयानामधील भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि भूमिकेची श्री मोदींनी प्रशंसा केली. स्वामी दयानंद सरस्वती यांची या वर्षी 200 वी जयंती आम्ही साजरी करत असल्याने हे वर्ष देखील खूप खास आहे,असे त्यांनी यावेळी नमूद केली.पंतप्रधान सुरीनामच्या राष्ट्रपतींना भेटले
November 21st, 10:57 pm
दोन्ही नेत्यांनी यावेळी विद्यमान द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला तसेच त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि वाणिज्य, कृषी, युपीआय आणि आयसीटी यांसारखे डिजिटल उपक्रम, आरोग्यसेवा आणि औषधनिर्मिती, क्षमता निर्मिती, संस्कृती आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्यावर सहमती व्यक्त केली. सुरीनामला विकासविषयक सहकार्यासाठी विशेषतः समुदाय विकास प्रकल्प, अन्न सुरक्षा विषयक उपक्रम आणि लघु तसेच मध्यम उद्योग या क्षेत्रांमध्ये भारत देत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल राष्ट्रपती संतोखी यांनी कौतुक व्यक्त केले.पंतप्रधानांनी ग्रेनेडाच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 10:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेनेडाचे पंतप्रधान डिकॉन मिशेल,यांची 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली.त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांची,पंतप्रधान मोदी यांनी घेतली भेट
November 21st, 10:42 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महामहीमपंतप्रधानांनी गयाना मधील भारतीय आगमन स्मारकाला दिली भेट
November 21st, 10:00 pm
स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहताना, पंतप्रधानांनी गयानामधील भारतीय समुदायाचा संघर्ष आणि बलिदानाचे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्वाच्या योगदानाचे स्मरण केले. स्मारकाजवळ त्यांनी बेल पत्राचे रोप लावले.हे स्मारक 1838 मध्ये गयाना येथे करारबद्ध भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेल्या पहिल्या जहाजाची प्रतिकृती आहे. भारताने 1991 मध्ये गयानाच्या नागरिकांना दिलेली ही भेट आहे.पंतप्रधानांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
November 21st, 09:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानामध्ये जॉर्ज टाऊन इथल्या ऐतिहासिक प्रोमनेड गार्डनला भेट दिली आणि तिथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. बापूंचे शांतता व अहिंसा याबाबतचे विचार मानवतेला नेहमीच मार्गदर्शन करतील असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1969 मध्ये गांधीजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभारण्यात आला.पंतप्रधान डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:29 pm
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.पंतप्रधान अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:37 am
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 09:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया अमोर मोटली यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे भारत-CARICOM शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. या उच्च-स्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना दुजोरा दिला आणि मजबूत करण्यासाठी संमती दर्शवली.पंतप्रधानांनी गयानाच्या राष्ट्राध्यक्षांशी अधिकृत चर्चा केली
November 21st, 04:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाऊनमधील सरकारी निवासात गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान आली यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी सरकारी निवासात आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष आली यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या सन्मानार्थ औपचारिक मानवंदन सोहोळा आयोजित केला.‘एक पेड मां के नाम’ अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली यांनी नोंदवला सहभाग
November 20th, 11:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली गयाना, जॉर्जटाउन येथे ‘एक पेड मां के नाम’ या अभियानात सहभागी झाले. मोदींनी या उपक्रमाला शाश्वततेबद्दलचा सामायिक संकल्प असे म्हटले आहे.