पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
January 11th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.गुजरातमधील सुरत येथे सुरत हिरे बाजाराचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 17th, 12:00 pm
सुरत म्हणजे सुरत! सुरतकडे इतिहासाचा अनुभव आहे, वर्तमानाचा वेग आहे आणि भविष्याची दूरदृष्टी आहे, या सर्वांचे नाव आहे सुरत!! आणि हे सुरत माझे सुरत आहे. कोणत्याही कामामध्ये एकही कसर सोडली जात नाही, असे हे सुरत आहे. त्याच प्रमाणे सर्व गोष्टींच्या बाबतीत सुरतकरांना कितीही घाई, गडबड असली तरी, भोजन तसेच खाण्या-पिण्याच्या दुकानामध्ये जर अर्धा तास रांग लावावी लागत असेल तरीही त्यांच्या मते काही हरकत नाही, त्यांच्याकडे तितका धीर नक्कीच आहे. प्रचंड पाऊस असो आणि अगदी गुडघ्यापर्यंत पाणी भरलेले असो, परंतु पकोडे -भजीच्या दुकानामध्ये जायचं आहे म्हणजे जायचंच. शरद पौर्णिमा, चंडी पाडवा, या दिवशी जगातले सगळे लोक घराच्या गच्चीवर जातात. आणि इथं, आमचे सुरतकर रस्त्याच्या कडेला संपूर्ण कुटुंबाबरोबर घारी म्हणजे मिठाई खात असतात. आणि त्यामध्ये त्यांना आनंद इतका मिळत असतो की, हे साहेब जवळच्या कोणत्याही स्थळांना फिरायला जात नाहीत, मात्र संपूर्ण विश्वामध्ये फिरतात. मला आठवते की, 40-45 वर्षांपूर्वी सौराष्ट्रातील बंधू सुरतच्या दिशेने गेले, त्यावेळी मी सोराष्ट्रातील आमच्या जुन्या मित्रांना विचारत होतो की, तुम्ही सौराष्ट्र सोडून सुरतेमध्ये आला आहात, तर कसे वाटते? त्यावेळी ते म्हणत होते सुरतमध्ये आणि आमच्या काठियावाडमध्ये खूपच फरक आहे. ही गोष्ट मी 40-45 वर्षांपूर्वींची सांगतोय. मी विचारत होतो, काय फरक आहे? तर ते सांगत होते, काठियावाडमध्ये जर समोरा-समोर मोटारसायकलींची धडक झाली तर दोघांमध्ये तलवार बाहेर काढण्यापर्यंत वितंडवाद होत असे. मात्र सुरतमध्ये अशा प्रकारे मोटारसायकलींची धडक झाली तर, लगेच म्हणतात, असं आहे भाई, चूक तर तुझी आहे आणि माझीही चूक आहे, आता दे सोडून! इतके अंतर आहे.पंतप्रधानांनी सूरत हिरे बाजाराचे केले उद्घाटन
December 17th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सूरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली, सुरत हिरे बाजार आणि स्पाइन-4 च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी देखील केली. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.अठराव्या भारत-रशिया शिखरपरिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चर्चा
June 01st, 08:05 pm
PM Narendra Modi while addressing the India-Russia business forum today said, “Trade, commerce, innovation and engineering are sectors of immense importance and companies from Russia could explore the opportunities Indian market has to offer.” PM Modi also expressed content over enhanced defence ties between India and Russia in recent years.PM Modi inaugurates Diamond Manufacturing Unit in Surat, Gujarat
April 17th, 10:56 am
PM Narendra Modi inaugurated the Diamond Manufacturing Unit of M/s Hare Krishna Exports Pvt Ltd in Surat. The Prime Minister said Surat has made a mark in the diamond industry but there is now need to look at the entire gems and jewellery sector. He said that as far as the gems and jewellery sector is concerned, our aim should not only be ‘Make in India’ but also 'Design in India'.