गायत्री परिवार अश्वमेध यज्ञ कार्यक्रमात पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

February 25th, 09:10 am

गायत्री परिवाराचे कोणतेही आयोजन इतके पवित्र असते की त्यामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही देखील खरोखरच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. आज देव संस्कृती विद्यापीठाद्वारे आयोजित अश्वमेध यज्ञाचा एक भाग बनायला मिळत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. जेव्हा मला गायत्री परिवाराकडून या अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले होते, तेव्हा, वेळेच्या अभावाबरोबरच माझ्यासमोर एक दुविधा देखील होती. व्हिडिओच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यात एक समस्या ही होती की सामान्य माणूस अश्वमेध यज्ञाचा संबंध सत्तेच्या विस्ताराशी जोडून पाहतो. सध्या निवडणुकीच्या दिवसात तर हे स्वाभाविकच आहे की अश्वमेध यज्ञाचे इतर काही अर्थ देखील काढले गेले असते. पण नंतर मग मी पाहिले की हा अश्वमेध यज्ञ, आचार्य श्रीराम शर्मा यांच्या भावनांचा पुरस्कार करत आहे. अश्वमेध यज्ञाचा नवा अर्थ प्रस्थापित करत आहे, तशा माझ्या सर्व दुविधा दूर झाल्या.

गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून केले संबोधित

February 25th, 08:40 am

गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘अश्वमेध यज्ञा’शी जोडले जाण्याबाबत आपल्या संबोधनाची सुरुवात करताना द्विधा मनस्थितीचा उल्लेख केला कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो असे ते म्हणाले. मात्र जेव्हा आपण आचार्य श्री राम शर्मा यांच्या भावना जपण्यासाठी अश्वमेध यज्ञ पाहिला आणि त्यातला अभिप्रेत अर्थ जाणून घेतला, तेव्हा आपल्या शंका दूर झाल्या.असे त्यांनी सांगितले.