दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित, इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023, या भारतीय कला, वास्तूकला आणि रचना या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

December 08th, 06:00 pm

प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.

दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्‌घाटन

December 08th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी) अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित केले. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम दिल्लीतील सांस्कृतिक ठिकाणांची ओळख करून देईल.

जागतिक शांततेसाठी आयोजित कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनातील पंतप्रधानांचे भाषण

February 03rd, 07:48 pm

कृष्णगुरु सेवाश्रमात जमलेल्या सर्व संत-ऋषीजनांना आणि भक्तांना माझे विनम्र अभिवादन. कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाचा हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. मला आनंद आहे की कृष्णगुरुजींनी पुढे नेलेली ज्ञान, सेवा आणि मानवतेची प्राचीन भारतीय परंपरा आजही अखंडपणे गतीमान आहे. गुरुकृष्ण प्रेमानंद प्रभूजींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने तसेच कृष्णगुरुंच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे या कार्यक्रमात ती दिव्यता स्पष्टपणे दिसून येते. या निमित्ताने आसाममध्ये येऊन तुम्हा सर्वांसह या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा होती! कृष्णगुरुजींच्या पवित्र तपोभूमीत येण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण कदाचित माझ्या प्रयत्नातच काही कमतरता होती की इच्छा असूनही मी आत्तापर्यंत तिथे येऊ शकलो नाही. कृष्णगुरुंच्या आशीर्वादाने मला येणाऱ्या काळात तिथे येऊन तुम्हा सर्वांना नमन करण्याची, तुमचे दर्शन घेण्याची संधी मिळावी अशी माझी मनोकामना आहे.

जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 03rd, 04:14 pm

आसाममधील बारपेटा येथील कृष्णगुरु सेवाश्रम येथे आयोजित जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन हे महिनाभर चालणारे कीर्तन 6 जानेवारीपासून कृष्णगुरु सेवाश्रम इथे आयोजित करण्यात आले आहे.

जगातील सर्वाधिक लांबीच्या एमव्ही गंगा विलास या रिव्हर क्रूझला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्याच्या आणि वाराणसीच्या टेंट सिटीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 13th, 10:35 am

आज आकांक्षांनी भरलेला लोहरीचा सण आहे. आगामी दिवसात आपण उत्तरायण, मकर संक्रांत, भोगी, बिहू, पोंगल यांसारखे अनेक सण देखील साजरे करणार आहोत. मी देशात आणि जगामध्ये हे सण साजरे करत असलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा देत आहे, शुभकामना देत आहे.

पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसीमध्ये जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले

January 13th, 10:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी देखील केली. रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली रिव्हर क्रूझची प्रचंड क्षमता वापरात येईल आणि भारतासाठी रिव्हर क्रूझ पर्यटनाच्या नव्या युगाचा प्रारंभ करेल.