भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम
September 18th, 04:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर यशस्वीरीत्या उतरल्यावर पृथ्वीवर परतण्यात वापरलेले तंत्रज्ञान प्रदर्शित करणे तसेच चंद्रावरून नमुने आणून पृथ्वीवर त्यांचे विश्लेषण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. चांद्रयान-4 मोहीम भारताच्या चंद्रावर उतरण्यासाठी (वर्ष 2040 पर्यंत नियोजित) आणि पृथ्वीवर सुरक्षित परतण्यासाठी मूलभूत तंत्रज्ञान क्षमता प्राप्त करेल. डॉकिंग/अनडॉकिंग, लँडिंग, पृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरील नमुना संकलन आणि विश्लेषण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.गोव्यामधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 26th, 10:59 pm
व्यासपीठावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष भगिनी पीटी उषा जी, देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले माझे सर्व खेळाडू मित्र, मदतनीस कर्मचारी, इतर पदाधिकारी आणि युवा मित्रांनो, भारतीय क्रीडा महाकुंभाचा प्रवास आज गोव्यात येऊन पोहोचला आहे. सगळीकडे रंग आहे...तरंग आहेत...रोमांच आहे..उत्साह आहे. गोव्याच्या हवेत असेच काहीसे आहे. आपणा सर्वांना सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
October 26th, 05:48 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गोव्यामध्ये भारतीय खेळांच्या महाकुंभाचा प्रवास सुरू झाला आहे आणि संपूर्ण वातावरण विविध रंग, लहरी, उत्साह आणि साहसाने भरून गेले आहे. गोव्याच्या तेजोवलयासारखे दुसरे काहीच असू शकत नाही असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी गोव्याच्या जनतेचे अभिनंदन केले आणि 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये गोव्याचे योगदान अधोरेखित केले आणि गोव्याच्या फुटबॉल प्रेमाचा दाखला दिला. क्रीडाप्रेमी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हीच मुळी एक उत्साहाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.मिशन गगनयान टीव्ही डी 1 चाचणी उड्डाणाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
October 21st, 12:56 pm
मिशन गगनयान टीव्ही डी1 चाचणी उड्डाणाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम साकार होण्याच्या दिशेने या यशाने देशाला एक पाऊल पुढे नेले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला गगनयान मोहिमेच्या सज्जतेचा आढावा
October 17th, 01:53 pm
भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्यातील प्रयत्नांची रूपरेषा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.