जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.पंतप्रधान 26 सप्टेंबर रोजी जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट उपक्रमाच्या अंतिम सत्राला करणार संबोधित
September 25th, 06:47 pm
जी 20 जन भागीदारी आंदोलनात देशभरातील विविध शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास संस्थांमधील 5 कोटींहून अधिक तरुणांनी विक्रमी सहभाग नोंदवला होता. भारतातील तरुणांमध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत धारणा निर्माण करण्यासाठी तसेच विविध जी 20 आयोजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतभरातील विविध विद्यापीठांमधील 1 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिन दिनानिमित्त सुरुवातीला 75 विद्यापीठांसाठी हा कार्यक्रम नियोजित केला गेला होता, मात्र हा उपक्रम विस्तारत जाऊन त्यात भारतातील 101 विद्यापीठे सामिल झाली होती.