गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2024 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 10th, 10:30 am
तुम्हां सर्वांना 2024 या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नजीकच्या भूतकाळातच भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आता भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीची शतकपूर्ती साजरी करेल तोपर्यंत भारताला विकसित रूप देण्याचे उद्दिष्ट आपण निश्चित केले आहे. आणि म्हणूनच, 25 वर्षांचा हा कार्यकाळ, भारतासाठी अमृतकाळ आहे. ही नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि नित्य-नव्या यशस्वी कार्यांचा काळ आहे. याच अमृतकाळात ही पहिली व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद होत आहे. आणि म्हणूनच या परिषदेचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. या परिषदेला उपस्थित राहिलेले 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, भारताच्या या विकास यात्रेचे महत्त्वाचे सहयोगी आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, तुमचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या हस्ते 10 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन
January 10th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे उद्घाटन झाले. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना, “भविष्यासाठीचा मार्ग” अशी असून त्यात, 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्थांचा सहभाग आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयासाठी एक व्यासपीठ म्हणूनही ह्या शिखर परिषदेचा वापर होत असून, त्याद्वारे ईशान्य भारत प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी उद्योजकांसमोर मांडल्या जात आहेत.आभासी G-20 परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले निवेदन (22 नोव्हेंबर 2023)
November 22nd, 09:39 pm
आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.जी 20 आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
November 22nd, 06:37 pm
मला आठवते, माझे मित्र आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला माझ्याकडे औपचारिक अध्यक्षपद सोपवले होते , तेव्हा मी सांगितले होते की, आपण सर्वजण मिळून जी -20 ला सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक बनवू. आपण एकत्रितपणे एका वर्षात हे साध्य केले आहे. आपण एकत्रितपणे जी -20 ला नवीन उंचीवर नेले आहे.जी-20 शिखर परिषदेत, भारताच्या नेतृत्वासंदर्भातले बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 08th, 07:31 pm
जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. आणि आता यावर्षी भारत या जी-20 समूहाचे नेतृत्व करणार आहे, त्याचे अध्यक्षपद भूषवणार आहे.पंतप्रधानांनी भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले अनावरण
November 08th, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.