The relationship between India and Kuwait is one of civilizations, seas and commerce: PM Modi
December 21st, 06:34 pm
PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.Prime Minister Shri Narendra Modi addresses Indian Community at ‘Hala Modi’ event in Kuwait
December 21st, 06:30 pm
PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
December 11th, 05:00 pm
मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील सहभागींशी साधला संवाद
December 11th, 04:30 pm
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या 'सबका प्रयास' या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 11th, 02:00 pm
आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन
December 11th, 01:30 pm
महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.अहमदाबाद येथील रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 09th, 01:30 pm
परमपूज्य श्रीमत् स्वामी गौतमानंद जी महाराज, रामकृष्ण मठ आणि मिशनचे देश-विदेशातून आलेले आदरणीय संत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, या कार्यक्रमाशी संबंधित इतर सर्व मान्यवर,आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, नमस्कार!पंतप्रधानांनी गुजरातमध्ये रामकृष्ण मठाद्वारे आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
December 09th, 01:00 pm
गुजरातमध्ये रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पूजनीय श्रीमद स्वामी गौतमानंद जी महाराज यांच्यासह, रामकृष्ण मठ आणि मिशन संस्थेच्या देशविदेशातील आदरणीय संतांप्रती तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य मान्यवरांप्रती अभीष्टचिंतन व्यक्त केले. तसेच माता शारदादेवी, गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. आजचा कार्यक्रम श्रीमद स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित केला असल्याचा उल्लेखही करत त्यांनी त्यांनाही आदरांजली अर्पण केली.जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 09th, 11:00 am
राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन
December 09th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या समर्पणाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 03rd, 12:15 pm
चंदीगडमध्ये आलो की मला माझ्याच लोकांमध्ये आल्यासारखे वाटते. चंदीगडची ओळख शक्तीस्वरूपा माँ चंडिका देवीच्या नावाशी जोडलेली आहे. माँ चंडी म्हणजे शक्तीचे असे स्वरूप, जे सत्य आणि न्यायाची पाठराखण करते. हीच भावना भारतीय न्याय संहिता आणि नागरी सुरक्षा संहितेच्या संपूर्ण मसुद्याचा पाया आहे. आज देश विकसित भारताच्या संकल्पासह आगेकूच करतो आहे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत... अशा वेळी संविधानाच्या भावनेने प्रेरित भारतीय न्यायिक संहितेची अंमलबजावणी होते आहे, ही एक मोठी सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी कल्पना केलेल्या आदर्शांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक ठाम प्रयत्न आहे. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होईल, याचे प्रात्यक्षिक अर्थात लाईव्ह डेमो मी आता पाहत होतो. आणि मी इथल्या प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी वेळ काढून हा लाईव्ह डेमो पाहावा. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी पहावे, बार मधील सहकाऱ्यांनी पहावे, न्यायपालिकेच्या मित्रांना शक्य असले, तर त्यांनीही पहावे. या निमित्ताने मी सर्व देशवासियांना भारतीय न्याय संहिता, नागरी संहिता लागू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि चंदीगड प्रशासनाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे लोकार्पण
December 03rd, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड येथे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनकारी नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केली. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी चंडीगढची ओळख सत्य आणि न्याय प्रस्थापित करणारी शक्ती माँ चंडी देवीशी निगडित असल्याचे नमूद केले . हेच तत्त्वज्ञान भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या संपूर्ण स्वरूपाचा आधार असल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेच्या भावनेने प्रेरित भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हा एक गौरवशाली क्षण होता कारण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण करण्याच्या तसेच भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होता असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी ज्या आदर्शांची कल्पना केली , ती पूर्ण करण्याच्या दिशेने हा एक ठोस प्रयत्न आहे. मोदी म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची याची झलक त्यांना थेट प्रात्यक्षिकातून पहायला मिळाली. पंतप्रधानांनी लोकांना कायद्यांचा हा लाईव्ह डेमो पाहण्याचे आवाहन केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चंदीगड प्रशासनातील सर्व संबंधितांचेही त्यांनी अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना विकसित भारत युवा नेते संवादाचा भाग बनणे सुनिश्चित करणाऱ्या प्रश्नमंजुषामध्ये भाग घेण्याचे केले आवाहन
November 27th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुणांना ऐतिहासिक विकसित भारत युवा नेते संवादाचा भाग बनणे सुनिश्चित करण्यासाठी प्रश्नमंजुषामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. आपले विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात युवकांचे योगदान अमिट असेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.आयसीए जागतिक सहकारी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 25th, 03:30 pm
भूतानचे पंतप्रधान आणि माझे धाकटे बंधू, फिजीचे उपपंतप्रधान, भारताचे सहकार मंत्री अमित शाह, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्राचे सर्व प्रतिनिधी, जगभरातून आलेले सहकार विश्वाशी संबंधित सर्व मित्र, भगिनी आणि सद्गृहस्थ हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आयसीए जागतिक सहकार परिषदेचे उद्घाटन
November 25th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ICA ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात संबोधित करताना मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे, फिजीचे उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष अलायन्स मिस्टर एरियल ग्वार्को, परदेशातील विविध मान्यवर आणि आयसीए जागतिक सहकार परिषदेतील महिला आणि पुरुषांचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, हे स्वागत केवळ त्यांच्या एकट्याकडून नव्हे तर हजारो शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, 8 लाखांहून अधिक सहकारी संस्था, बचत गटांशी संबंधित 10 कोटी महिला आणि सहकारात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात गुंतलेल्या युवा वर्गाकडून केले जात आहे.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद
November 25th, 10:31 am
हे हिवाळी अधिवेशन आहे आणि आता वातावरण देखील थंड असणार आहे. आपण आता 2024 च्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि प्रचंड उर्जा आणि मोठ्या उत्साहासह संपूर्ण देश 2025 चे स्वागत करण्यासाठी उत्सुकतेने तयारी करत आहे.आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परिषदेचे पंतप्रधान आज करणार उद्घाटन
November 24th, 05:54 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज 25 नोव्हेंबर रोजी,दुपारी 3 वाजता,भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परीषद-2024(ICA, ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स) याचे उद्घाटन करतील तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे पुढील वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 असल्याचे जाहीर करत, त्यांचा आरंभ करतील.दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण
November 21st, 02:21 am
आपण सर्वांनी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे आणि व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांचे मी स्वागत करतो. माझा चमू तुमच्याबरोबर भारताच्या प्रस्तावांच्या संदर्भात सर्व तपशील सामायिक करेल आणि आपण सर्व बाबतीत कालबद्ध रितीने पुढे जाऊ.तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे: पंतप्रधान
November 20th, 05:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे.हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.