फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख
December 17th, 05:19 pm
फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त
November 30th, 09:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डॉ. मुखर्जी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांना संगीत तसेच काव्याचीही आवड होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 20th, 11:45 am
दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित
September 20th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.रौप्यपदक पटकावणाऱ्या योगेश कथुनिया या खेळाडूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 02nd, 08:15 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज पुरुषांच्या थाळी फेक F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल क्रीडापटू योगेश कथुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 09th, 08:14 am
फ्रान्समध्ये पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरज यापुढेही आपल्या क्रीडापटूंना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहील आणि भारताचा अभिमान उंचावत राहील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत बैठक
June 14th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.निवडणुकीत पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन
June 06th, 03:02 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 16th, 11:30 am
विकसित भारत विकसित राजस्थान या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये यावेळेस राजस्थानच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून लाखो मित्र सहभागी झाले आहेत. मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी मुख्यमंत्री जी यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी तंत्रज्ञानाचा एवढा अप्रतिम वापर करून लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला संधी प्राप्त करून दिली. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आपण जयपुर मध्ये ज्या प्रकारे स्वागत सत्कार केला त्याचा आवाज संपूर्ण भारतात दुमदुमत आहे. एवढेच नाही तर फ्रान्स मध्ये सुद्धा त्याचीच चर्चा ऐकू येत आहे.आणि हीच तर राजस्थानच्या लोकांची खरी ओळख आहे.पंतप्रधानांनी ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ कार्यक्रमाला केले संबोधित
February 16th, 11:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'विकसित भारत विकसित राजस्थान' कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी 17,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत.आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 02:45 pm
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वांना अभिवादन.आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, हे महत्वपूर्ण आहे. हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन. या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल मी आयर्लंड आणि फ्रान्सचेही आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीला केले संबोधित
February 14th, 02:39 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केले आणि या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल आयर्लंड आणि फ्रान्सचे आभार मानले.French President Emmanuel Macron shares video of his recent visit to India
February 04th, 11:17 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep gratitude for French President Emmanuel Macron's visit to India. Shri Modi has responded to the X post of French President, Emmanuel Macron wherein Macron has shared his experience about his recent visit to India. He has shared a video that gave a glimpses of his recent trip during the Republic Day celebrations in Delhi.PM congratulates France for formal launch of UPI
February 02nd, 10:30 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, congratulated France for the formal launch of Unified Payments Interface (UPI) at the Eiffel Tower in Paris today.Glimpses from 75th Republic Day celebrations at Kartavya Path, New Delhi
January 26th, 01:08 pm
India marked the 75th Republic Day with great fervour and enthusiasm. The country's perse culture, prowess of the Armed Forces were displayed at Kartavya Path in New Delhi. President Droupadi Murmu, Prime Minister Narendra Modi, President Emmanuel Macron of France, who was this year's chief guest, graced the occasion.फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत
January 25th, 10:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे स्वागत केले.पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासह जयपूरमधील जंतरमंतरला दिली भेट
January 25th, 10:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत जयपूर येथील जंतरमंतरला भेट दिली.पंतप्रधान 25 जानेवारी रोजी बुलंदशहर आणि जयपूरच्या दौऱ्यावर
January 24th, 05:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर आणि राजस्थानमधील जयपूरला भेट देणार आहेत. बुलंदशहरमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास 19,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू तसेच शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. पंतप्रधान, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे जयपूरमध्ये स्वागत करतील. पंतप्रधान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासमवेत, जंतर मंतर आणि हवा महल यासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या विविध ठिकाणांना भेट देतील.पंतप्रधानांची फ्रेंच प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींसोबत भेट
December 01st, 09:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी, दुबईतील कॉप 28 शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय बैठक घेतली.