पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर
June 19th, 04:26 pm
20 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) येथे ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे (जेकेसीआयपी) उद्घाटन करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमध्ये पीएम-स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना करणार संबोधित
March 13th, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमधील जेएलएन स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. यावेळी ते दिल्लीमधील रस्त्यावरील 5,000 विक्रेत्यांसह (एसव्ही) 1 लाख एसव्हींना योजनेंतर्गत कर्जाचे वितरण देखील करतील.पंतप्रधान 13 मार्च रोजी ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ मध्ये सहभागी होऊन सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार
March 12th, 03:40 pm
देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून सेमीकंडक्टर संरचना, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, गुजरातमधील धोलेरा विशेष गुंतवणूक प्रदेशात (डीएसआयआर) सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधेसाठी; आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधेसाठी; आणि गुजरातमधील साणंद येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधेसाठी पायाभरणी करण्यात येईल.सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार
February 22nd, 04:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.पंतप्रधान 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर
February 21st, 11:41 am
पंतप्रधान, 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, अहमदाबाद येथे, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी 12:45 वाजता महेसाणा येथे पोहोचतील आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 1 वाजता, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. पंतप्रधान, दुपारी 4:15 च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 24,700कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी सुमारे 6:15 वाजता, काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील.पंतप्रधान एम्स रेवाडीची बसवणार कोनशिला
February 15th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी हरयाणामधील रेवाडीला भेट देणार आहेत. दुपारी एक वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पंतप्रधान, 9750 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. 5450 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात येणार असलेल्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कोनशिला देखील ते बसवतील. हा प्रकल्प 28.5 किमी लांबीचा असून मिलेनियम सिटी सेंटर ते उद्योग विहार फेज-5 यांना जोडेल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या रॅपिड मेट्रो रेल गुरुग्रामच्या मेट्रो जाळ्यात सायबर सिटीजवळ मौलसारी ऍव्हेन्यू स्टेशन येथे विलिन होईल.पंतप्रधान 16 फेब्रुवारीला ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला करणार संबोधित
February 15th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 17,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, सौरऊर्जा, वीज पारेषण,पेयजल तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आहेत.पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील
December 01st, 12:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 14th, 12:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन
September 14th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.पंतप्रधान 15 सप्टेंबर रोजी बिहारमधील शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित सात प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार
September 14th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित सात प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार आहेत. यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठा, दोन सांडपाणी शुद्धीकरण व एक नदी विकासाशी संबंधित आहेत. या प्रकल्पांचा एकूण खर्च 541 कोटी रुपये आहे. बिहारच्या नगरविकास व गृहनिर्माण विभागांतर्गत या प्रकल्पांची अंमलबजावणी बिडको द्वारे केली जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय शैक्षणीक धोरण 2020 संदर्भात आयोजित राज्यपालांच्या परिषदेच्या उद्घाटन सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन
September 07th, 11:20 am
आदरणीय राष्ट्रपती, मंत्रिमंडळातील माझे सहकारी रमेश पोखरियाल निशंक जी, संजय धोत्रे जी, या परिषदेत सहभागी सर्व आदरणीय राज्यपाल, उपराज्यपाल, राज्यांचे शिक्षण मंत्री, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर कस्तुरीरंगन आणि त्यांचा चमू, विविध विद्यापीठांचे कुलपती, शैक्षणिक तज्ञ आणि माझ्या बंधू भगिनींनो,राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील राज्यपालांच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 07th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील राज्यपालांच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. या परिषदेला राष्ट्रपती देखील उपस्थित होते आणि विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल तसेच नायब राज्यपाल आणि सर्व राज्य विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.सोशल मीडिया कॉर्नर 18 फेब्रुवारी 2018
February 18th, 08:45 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन समारंभात
February 18th, 05:02 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री विद्यासागर राव, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रातले माझे सहकारी नितीन गडकरी, अशोक गजपती राजू, राज्य सरकारमधले मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास समारंभाला पंतप्रधान उपस्थितजेएनपीटी येथील चौथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण
February 18th, 05:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास समारंभाला उपस्थित राहिले. नवी मुंबईत झालेल्या एका समारंभात त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील चौथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण केले.We have made aviation affordable and within reach of the lesser privileged: PM Modi
October 07th, 02:24 pm
PM Narendra Modi today laid foundation stone for Greenfield Airport at Rajkot, Gujarat. Speaking at a public meeting in Surendranagar, PM Modi said that definition of development was changing. He said, Who imagined in this district that an airport will come? Such development works will empower citizens.राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळासाठी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन, चोटीला इथे जाहीर सभेला केले संबोधित
October 07th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या चोटीला इथे जाहीर सभा घेतली.राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमीपूजन, तसेच अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण आणि राजकोट-मोरबी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाची कोनशिलाही पंतप्रधानांच्याहस्तेबसवण्यात आली.Diwali has come early for our citizens due to the decisions taken in the GST Council: PM
October 07th, 12:04 pm
PM Narendra Modi today laid foundation stone for bridge between Okha and Beyt Dwarka. Addressing a public meeting, PM Modi stressed on building of infrastructure that would enhance economic activities and add to development.द्वारकाधीश मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना,द्वारका इथे जनसभेलाही केले संबोधित
October 07th, 12:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना करून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याला सुरुवात केली.