पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले भाषण

August 31st, 10:30 am

तुम्ही लोक खूप गंभीर आहात, त्यामुळे मला असे वाटते की हा सोहळाही खूप गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी मी राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाला गेलो होतो. आणि, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा आहे भारताच्या संविधानाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रवास! हा प्रवास आहे- एक लोकशाही म्हणून भारताचा अधिक परिपक्व होण्याचा प्रवास! आणि या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक जाणकारांचे योगदान मोलाचे आहे. यात पिढ्यानपिढ्या कोट्यवधी देशबांधवांचे योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. भारतातील जनतेने सर्वोच्च न्यायालयावर, आपल्या न्यायव्यवस्थेवर कधीच अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ही 75 वर्षे लोकशाहीची माता म्हणून भारताचा बहुमान आणखी वाढवत आहेत. हे आपल्या सांस्कृतिक घोषणेला बळ देते – ज्यामध्ये म्हटले आहे सत्यमेव जयते, नानृतम्. यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून संविधानाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे या प्रसंगी अभिमानही आहे, सन्मान आहे आणि प्रेरणा आहे. या निमित्त मी तुम्हा सर्व विधिज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे केले उदघाटन

August 31st, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी 75 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन देखील केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी पाच कामकाजांची सत्रे आयोजित केली आहेत; ज्यात पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटल्यांचे व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,या विषयांचा समावेश आहे.

सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 03rd, 03:50 pm

काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन

April 03rd, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.

A Digital India guarantees transparency, effective service delivery and good governance: PM Modi

October 07th, 06:15 pm

PM Narendra Modi today dedicated new campus building of IIT Gandhinagar to the nation and launched Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Scheme. Speaking at the event, the PM said, Work is underway to spread digital literacy to every part of India, among all age groups and sections of society.

पंतप्रधानांच्या हस्ते आय आय टी गांधीनगर परिसर राष्ट्राला समर्पित

October 07th, 06:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आय आय टी गांधीनगर परिसर राष्ट्राला समर्पित केला.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज: पंतप्रधान मोदी

May 10th, 12:05 pm

At an event to mark introduction of digital filing as a step towards paperless Supreme Court, PM Narendra Modi emphasized the role of technology. PM urged to put to use latest technologies to provide legal aid to the poor. He added that need of the hour was to focus on application of science and technology.

सर्वोच्च न्यायालयाचा व्यवहार कागद रहित करण्याच्या दिशेने पहिले पाउल; खटला नोंदविण्यासाठी डिजिटल पद्धतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

May 10th, 12:00 pm

सर्वोच्च न्यायालयाच्या एकीकृत खटला व्यवस्थापन प्रणालीचा (ICMIS) शुभारंभ करताना पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या महत्वावर भर दिला. ई-प्रशासनाचे महत्व सांगताना ते म्हणाले की ही पद्धत सोपी, किफायतशीर, परिणामकारक आणि कागदाचा कमी वापर होत असल्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल देखील आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञान वापरणाऱ्या गरिबांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी एक चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Text of PM's remarks at Joint Conference of Chief Ministers of States and Chief Justices of High Courts

April 05th, 06:05 pm

Text of PM's remarks at Joint Conference of Chief Ministers of States and Chief Justices of High Courts