Prime Minister Narendra Modi meets with Prime Minister of Lao PDR

October 11th, 12:32 pm

Prime Minister Narendra Modi held bilateral talks with Prime Minister of Lao PDR H.E. Mr. Sonexay Siphandone in Vientiane. They discussed various areas of bilateral cooperation such as development partnership, capacity building, disaster management, renewable energy, heritage restoration, economic ties, defence collaboration, and people-to-people ties.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-26 या कालावधीसाठी पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम (एफ एम बी ए पी) ला दिली मंजुरी

February 21st, 11:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 ते 2025-26 (15 व्या वित्त आयोगाचा कालावधी) या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 4,100 कोटी रुपये खर्चाची “पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम (एफ एम बी ए पी) केंद्र पुरस्कृत योजना सुरू ठेवण्यासाठी जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पायाभरणी आणि विकास कामांचे उद्घाटन करतानाचे पंतप्रधानांचे भाषण

January 02nd, 12:30 pm

तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!

पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

January 02nd, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.

केंद्र सरकार आसाममधील पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारसोबत समन्वय राखून काम करत आहे : पंतप्रधान

June 23rd, 09:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार आसाममधील पूरस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवून असून या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने शक्य ती सर्व मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारसोबत समन्वय राखून काम करत आहे.

उष्णतेच्या लाटेबाबत व्यवस्थापनाचा आणि पावसाळ्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

May 05th, 08:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उष्णतेच्या लाटा व्यवस्थापन संबंधित परिस्थितीचा आणि पावसाळ्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेतला.

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन

February 14th, 10:39 am

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा ग्रामीण विकासावर सकारात्मक परिणाम या विषयावरील वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 23rd, 05:24 pm

Prime Minister Narendra Modi paid tribute to Netaji Subhas Chandra Bose on his 125th birth anniversary. Addressing the gathering, he said, The grand statue of Netaji, who had established the first independent government on the soil of India, and who gave us the confidence of achieving a sovereign and strong India, is being installed in digital form near India Gate. Soon this hologram statue will be replaced by a granite statue.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या होलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण; तसेच सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचेही वितरण

January 23rd, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ग्रॅनाईटच्या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत, हा होलोग्रॅमचा पुतळा तिथे राहणार आहे. नेताजींच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, याच ठिकाणी ग्रॅनाईटचा पुतळा बसवला जाणार आहे.

पंतप्रधानांची 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथला भेट व श्री आद्य शंकराचार्य समाधीचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन

October 28th, 06:17 pm

पंतप्रधान केदारनाथ मंदिरात प्रार्थना करतील. त्यानंतर ते श्री आद्य शंकराचार्य समाधीचे उद्‌घाटन करतील तसेच श्री आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील. 2013 मध्ये आलेल्या पुराने नष्ट झालेल्या आदि शंकराचार्यांच्या समाधीची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्पातील प्रगतीचा पंतप्रधान सातत्याने आढावा घेत होते तसेच त्यावर देखरेख करत होते. सरस्वती आस्थापथ येथे पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामाचाही पंतप्रधान आढावा घेतील.

पंतप्रधानांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबद्दल जाणून घेतली माहिती

August 31st, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबद्दल माहिती घेतली. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी केंद्राकडून शक्य त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.

पश्चिम बंगाल पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत पंतप्रधानांकडून जाहीर

August 04th, 08:31 pm

पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा त्यांनी केली.

मध्य प्रदेशातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत पंतप्रधानांकडून मंजूर

August 04th, 08:29 pm

मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली. तर जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या काही भागातील पूरस्थितीबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

August 04th, 01:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राज्यातील काही भागात धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पाठींबा देण्याच्या हेतूने केंद्र सरकार शक्य असलेली सर्व मदत करेल अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिली.

मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार मध्य प्रदेश सरकारसोबत समन्वयाने काम करीत आहे : पंतप्रधान

August 04th, 01:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार मध्य प्रदेशच्या राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करीत आहे. पंतप्रधानांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मन की बातमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता, त्याला सामुहिक व्यक्तिमत्वः पंतप्रधान मोदी

July 25th, 09:44 am

दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे, काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे, यावेळच्या ‘मन की बात’ ची सुरुवात याच क्षणांनी करुया. टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

July 22nd, 09:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि मुसळधार पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्रातील काही भागात उद्‌भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.

PM interacts with Karnataka CM on rainfall and flood situation in various parts of Karnataka

October 16th, 09:07 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi interacted with Karnataka Chief Minister, Shri B S Yediyurappa on the rainfall and flood situation in various parts of Karnataka.

पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी राज्याच्या काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत साधला संवाद

October 16th, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संवाद साधला.

आई.आई. टी., गवहाटी च्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन

September 22nd, 12:01 pm

या कार्यक्रमाला आपल्या सोबत उपस्थित देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक महोदय, आसाम चे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल महोदय, मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे महोदय, बोर्ड ऑफ गवर्नर्स चे अध्यक्ष डॉ राजीव मोदी महोदय, सिनेटचे सदस्य, या दीक्षांत सोहळ्यासाठी सर्व मान्यवर निमंत्रित, अध्यापक समूहातील सदस्य आणि माझे प्रिय विद्यार्थी,