PM Modi calls upon everyone to make meditation a part of their daily lives
December 21st, 12:28 pm
Prime Minister Shri Narendra Modi has called upon everyone to make meditation a part of their daily lives on World Meditation Day, today. Prime Minister Shri Modi remarked that Meditation is a powerful way to bring peace and harmony to one’s life, as well as to our society and planet.कार्यकर सुवर्ण महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 07th, 05:52 pm
या कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवानिमित्त मी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणी प्रणाम करतो. आज प्रमुख स्वामी महाराजांच्या 103 व्या जयंतीचा महोत्सवदेखील आहे. गुरुहरी प्रगट ब्रह्म स्वरूप प्रमुख स्वामी महाराजांना मी नमन करतो. भगवान स्वामी नारायण यांची शिकवण, प्रमुख स्वामी महाराजांचे संकल्प... आज परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे सिद्धीस जात आहे. हा एवढा भव्य कार्यक्रम, एक लाख कार्यकर्ता, युवा आणि मुलांद्वारे बीज, झाडे आणि फळे यांचे सार अभिव्यक्त करणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम...... भलेही मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, परंतु या कार्यक्रमाची ऊर्जा मला माझ्या हृदयात जाणवत आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज आणि सर्व संतांचे अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो.अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर सुवर्ण महोत्सवाला केले मार्गदर्शन
December 07th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबाद येथील कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज, आदरणीय संत, आणि सत्संगी परिवाराचे सदस्य आणि अन्य सन्माननीय व्यक्तींचे स्वागत केले, व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यकर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणकमलांना वंदन केले आणि प्रमुख स्वामी महाराज यांची आज एकशे तीनवी जयंती असल्याचेही स्मरण त्यांनी केले. परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे भगवान स्वामी नारायण यांची शिकवण आणि प्रमुख स्वामी महाराज यांची वचने आज फळाला येत आहेत. जवळपास एक लाख कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेत, तरुणांचे व बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून भरवलेल्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते स्वतः या कार्यक्रमस्थळी उपस्थित नसले तरी ते त्यातील ऊर्जेचा अनुभव घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उच्च कोटीच्या दैवी समारंभाबद्दल त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांचे आणि सर्व संतांचे अभिनंदन केले.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
September 26th, 12:15 pm
सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.पंतप्रधान मोदींनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांची भेट घेऊन त्यांना दिले प्रोत्साहन
September 26th, 12:00 pm
पंतप्रधान मोदींनी दोन सुवर्णपदके जिंकण्याचे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारताच्या बुद्धिबळ संघाशी संवाद साधला. या चर्चेत त्यांची मेहनत, बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता, AI चा या खेळावर होणारा परिणाम आणि यश मिळवण्याची जिद्द आणि संघभावनेचे महत्त्व या मुद्द्यांवर मुख्यत्वे भर होता.अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 06:31 am
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे. काश्मीर आणि श्रीनगरमधले हे वातावरण, ही ऊर्जा आणि अनुभूती, योगसाधनेतून जी शक्ती आपल्याला मिळते, ती श्रीनगरमध्ये जाणवते आहे. योग दिनानिमित्त मी आज काश्मीरच्या या भूमीवरून देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील योगसाधना करणाऱ्या सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देतो.आंतरराष्ट्रीय योग दिन -2024 निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योग सत्रात सहभाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर
June 19th, 04:26 pm
20 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) येथे ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे (जेकेसीआयपी) उद्घाटन करतील.पंतप्रधानांनी शशांकासनाचा व्हिडिओ केला सामायिक
June 19th, 08:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशांकासन (सशासमान आसन), या बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करणाऱ्या आणि पचन प्रक्रिया सुधारणाऱ्या योगासनाची एक चित्रफीत सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो. हे आसन करताना उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन योगाचा व्हिडीओ सामायिक केला
June 18th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन किंवा उंटासारख्या आसन मुद्रा यावरचा व्हिडीओ सामायिक केला आहे. या आसनामुळे पाठ आणि मानेचे स्नायू अधिक मजबूत होतात तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया आणि दृष्टी सुधारण्यास देखील ते मदत करते.Prime Minister Narendra Modi shares Bhadrasana Yoga Video
June 17th, 10:07 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has shared Bhadrasana detailed Yoga video describing its benefits for joints, which also reduces pain in the knees. Bhadrasana yoga pose is also good for the stomach.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पादहस्तासनावर ध्वनीचित्रफीत केली सादर
June 16th, 10:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पादहस्तासन(हात ते पाय अशी शरीर स्थिती) या योगासनावर सविस्तर ध्वनीचित्रफीती सादर केल्या आहेत. मणक्याच्या आरोग्यासाठी चांगले असणारे आणि मासिक पाळीचा त्रास कमी करण्यात मदत करणारे हे आसन नियमित करावे असे आवाहन, त्यांनी या चित्रफितीद्वारे लोकांना केले आहे.पंतप्रधानांनी सामाईक केला अर्ध चक्रासनाचा व्हिडिओ
June 15th, 09:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्ध चक्रासनाची एक व्हिडिओ क्लीप सामाईक केली आहे. निरोगी हृदय आणि उत्तम रक्ताभिसरण यासाठी या आसनाचा सराव करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी ताडासनावर आधारित चित्रफित केली सामायिक
June 13th, 09:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ताडासन किंवा ताडाच्या झाडाच्या मुद्रेप्रमाणे असणाऱ्या आसनावर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली.गायत्री परिवार अश्वमेध यज्ञ कार्यक्रमात पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
February 25th, 09:10 am
गायत्री परिवाराचे कोणतेही आयोजन इतके पवित्र असते की त्यामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही देखील खरोखरच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. आज देव संस्कृती विद्यापीठाद्वारे आयोजित अश्वमेध यज्ञाचा एक भाग बनायला मिळत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. जेव्हा मला गायत्री परिवाराकडून या अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले होते, तेव्हा, वेळेच्या अभावाबरोबरच माझ्यासमोर एक दुविधा देखील होती. व्हिडिओच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यात एक समस्या ही होती की सामान्य माणूस अश्वमेध यज्ञाचा संबंध सत्तेच्या विस्ताराशी जोडून पाहतो. सध्या निवडणुकीच्या दिवसात तर हे स्वाभाविकच आहे की अश्वमेध यज्ञाचे इतर काही अर्थ देखील काढले गेले असते. पण नंतर मग मी पाहिले की हा अश्वमेध यज्ञ, आचार्य श्रीराम शर्मा यांच्या भावनांचा पुरस्कार करत आहे. अश्वमेध यज्ञाचा नवा अर्थ प्रस्थापित करत आहे, तशा माझ्या सर्व दुविधा दूर झाल्या.गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून केले संबोधित
February 25th, 08:40 am
गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘अश्वमेध यज्ञा’शी जोडले जाण्याबाबत आपल्या संबोधनाची सुरुवात करताना द्विधा मनस्थितीचा उल्लेख केला कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो असे ते म्हणाले. मात्र जेव्हा आपण आचार्य श्री राम शर्मा यांच्या भावना जपण्यासाठी अश्वमेध यज्ञ पाहिला आणि त्यातला अभिप्रेत अर्थ जाणून घेतला, तेव्हा आपल्या शंका दूर झाल्या.असे त्यांनी सांगितले.आचार्य श्री एस. एन. गोयंका यांच्या 100 व्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दिलेला संदेश
February 04th, 03:00 pm
आचार्य श्री एस एन गोयंका जी यांच्या जन्मशताब्दी समारंभाची सुरुवात एक वर्षापूर्वी झाली होती. या एका वर्षात, देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासोबतच, कल्याण मित्र गोयंका जी यांच्या आदर्शांचे देखील स्मरण केले. आज जेव्हा त्यांच्या शताब्दी समारंभाची सांगता होत आहे, त्यावेळी, देश विकसित भारताचे संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने देखील वेगाने पुढे जात आहे. या प्रवासात, एस. एन गोयंका जी यांचे विचार आणि समाजाप्रती त्यांचे समर्पण यातून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. गुरुजी, भगवान बुद्धाचा मंत्र म्हणत असत—