अर्थसंकल्पानंतर कृषी आणि ग्रामीण समृद्धीसंबंधित वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 01:00 pm
या वर्षीचा अर्थसंकल्प हा आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वंकष अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून आमच्या धोरणांमधील सातत्य तर दिसून आलेच पण त्याचबरोबर विकसित भारताच्या संकल्पनेचा नवा विस्तार देखील दिसला. अर्थसंकल्पापूर्वी तुम्हा भागधारकांनी जी मौल्यवान माहिती दिली, ज्या सूचना केल्या, त्या अर्थसंकल्प तयार करण्यात आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. आता या अर्थसंकल्पातील बाबी अधिक प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात अमलात आणण्यात, या अर्थसंकल्पातील बाबींचा परिणाम खरोखरीच अधिकाधिक उत्तम आणि जलद पद्धतीने साध्य व्हावा, सगळे निर्णय आणि धोरणे प्रभावी व्हावीत या साठी तुम्हा सर्वांच्या भूमिकेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
March 01st, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि या वर्षीचा अर्थसंकल्प हा सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, जो धोरणांमध्ये सातत्य आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा नवा विस्तार दर्शवितो असे अधोरेखित केले. अर्थसंकल्पापूर्वी सर्व संबंधितांकडून मिळालेल्या मौल्यवान माहिती आणि सूचनांची त्यांनी दखल घेतली , ज्या खूप उपयुक्त होत्या. हा अर्थसंकल्प अधिक प्रभावी बनवण्यात हितधारकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे यावर त्यांनी भर दिला. विकसित भारताच्या ध्येयाच्या दिशेने आमचा संकल्प अतिशय स्पष्ट आहे आणि एकत्रितपणे आम्ही अशा भारताची उभारणी करत आहोत जिथे शेतकरी समृद्ध आणि सक्षम असतील, असे मोदी म्हणाले. एकही शेतकरी मागे राहू नये, प्रत्येक शेतकऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषी क्षेत्र हे विकासाचे पहिले इंजिन मानून शेतकऱ्यांना गौरवपूर्ण स्थान दिले आहे असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी दोन प्रमुख उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे: कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी, असे त्यांनी नमूद केले.बिहारमधील भागलपूर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 24th, 02:35 pm
मंचावर विराजमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, बिहार चे लोकप्रिय आणि बिहारच्या विकासासाठी समर्पित आमचे लाडके मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराजसिंह चौहान जी, जीतन राम मांझी जी, ललन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, राज्यमंत्री रामनाथ ठाकूर जी, बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय सिन्हा जी, राज्याचे इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधीगण, उपस्थित मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी,बिहारमधील भागलपूर येथून विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
February 24th, 02:30 pm
शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.याप्रसंगी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. मोदी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या भूमीमध्ये आध्यात्म,वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले. बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मला लाभले आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 06th, 04:21 pm
आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता मी उपस्थित आहे.Prime Minister Shri Narendra Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha
February 06th, 04:00 pm
PM Modi, replying to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha, highlighted India’s development journey under his government since 2014. He emphasized Sabka Saath, Sabka Vikas as the guiding principle, focusing on inclusive growth, SC/ST/OBC empowerment, Nari Shakti, and economic self-reliance through initiatives like MUDRA and PM Vishwakarma Yojana.Eastern India is a growth engine in the development of the country, Odisha plays a key role in this: PM
January 28th, 11:30 am
PM Modi inaugurated the Utkarsh Odisha – Make in Odisha Conclave 2025 in Bhubaneswar, highlighting Eastern India's role in national growth. He emphasized Odisha's historical trade significance, growing opportunities, and its potential to lead in various industries. The PM encouraged investors to seize the moment for Odisha’s development and praised the state’s contributions to New India’s progress.PM Modi inaugurates the 'Utkarsh Odisha' - Make in Odisha Conclave 2025 in Bhubaneswar
January 28th, 11:00 am
PM Modi inaugurated the Utkarsh Odisha – Make in Odisha Conclave 2025 in Bhubaneswar, highlighting Eastern India's role in national growth. He emphasized Odisha's historical trade significance, growing opportunities, and its potential to lead in various industries. The PM encouraged investors to seize the moment for Odisha’s development and praised the state’s contributions to New India’s progress.उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद
January 10th, 02:15 pm
निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो आणि उरलेला महिना काहीच करत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक निखिल कामत यांच्यासोबत साधला संवाद
January 10th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार निखिल कामत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. अतिशय मोकळेपणाने झालेल्या या संवादात त्यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहराशी त्यांचे फार पूर्वीपासून असलेले संबंध अधोरेखित केले.. त्यांनी नमूद केले की, गायकवाड राज्यातील वडनगर हे गाव तलाव, पोस्ट ऑफिस आणि लायब्ररी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह शिक्षणाच्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. गायकवाड राज्य प्राथमिक शाळा आणि भागवताचार्य नारायणाचार्य हायस्कूलमधील शालेय दिवसांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. वडनगरमध्ये बराच काळ व्यतीत करणारा चिनी तत्ववेत्ता झुआंगझांग यांच्यावरील चित्रपटाबद्दल त्यांनी एकदा चिनी दूतावासाला कसे लिहिले याची एक मनोरंजक कथा त्यांनी सामाईक केली. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला, ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान झाले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झु आंग झांग आणि त्यांच्या दोन मूळ शहरांमधील ऐतिहासिक संबंधाचा हवाला देत गुजरात आणि वडनगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे बंध दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि मजबूत संबंधांना अधोरेखित करत आहेत.Serving the people of Andhra Pradesh is our commitment: PM Modi in Visakhapatnam
January 08th, 05:45 pm
PM Modi laid foundation stone, inaugurated development works worth over Rs. 2 lakh crore in Visakhapatnam, Andhra Pradesh. The Prime Minister emphasized that the development of Andhra Pradesh was the NDA Government's vision and serving the people of Andhra Pradesh was the Government's commitment.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 2 लाख कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन
January 08th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. भगवान सिंहचलम वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी यांना अभिवादन करून मोदी म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने 60 वर्षांनंतर देशात सलग तिसऱ्यांदा आपले सरकार निवडून आले आहे.ते पुढे म्हणाले की, सरकार स्थापनेनंतर आंध्र प्रदेशात हा त्यांचा पहिला सरकारी कार्यक्रम होता. कार्यक्रमापूर्वी रोड शो दरम्यान भव्य स्वागत केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. आपल्या भाषणात ते म्हणाले की चंद्राबाबू नायडू यांच्या प्रत्येक शब्दाचा आणि भावनेचा मी आदर करतो . नायडू यांनी आपल्या भाषणात नमूद केलेली सर्व उद्दिष्टे आंध्र प्रदेश आणि भारतातील जनतेच्या पाठिंब्याने साध्य करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.Our government's intentions, policies and decisions are empowering rural India with new energy: PM
January 04th, 11:15 am
PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.PM Modi inaugurates the Grameen Bharat Mahotsav 2025
January 04th, 10:59 am
PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
December 23rd, 09:24 pm
आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 23rd, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.India - Sri Lanka Joint Statement: Fostering Partnerships for a Shared Future
December 16th, 03:26 pm
Prime Minister of India His Excellency Shri Narendra Modi and President of Sri Lanka His Excellency Anura Kumara Dissanayake had comprehensive and fruitful discussions at their meeting in New Delhi on 16 December 2024, during the latter’s State Visit to the Republic of India.श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
December 16th, 01:00 pm
अध्यक्ष दिसनायके यांचे मी भारतात अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करतो. तुमच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी तुम्ही भारताची निवड केली त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. अध्यक्ष दिसनायके यांच्या भेटीमुळे आमच्या संबंधांमध्ये नव्या उर्जेचा आणि गतिशीलतेचा संचार झाला आहे. आमच्या भागीदारीमध्ये आम्ही भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अंगिकार केला आहे. आमच्या आर्थिक भागीदारीत आम्ही गुंतवणूक-प्रणीत वृद्धीवर आणि संपर्कव्यवस्थेवर भर दिला आहे आणि भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी हे आमच्या भागीदारीचे प्रमुख स्तंभ असतील असा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान विद्युत ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन्स स्थापन करण्यासाठी आम्ही काम करू. सामपुर सौर ऊर्जा प्रकल्पाला गती दिली जाईल. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या ऊर्जा प्रकल्पांना एलएनजीचा पुरवठा केला जाईल. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजू ईटीसीए लागू करण्यासाठी पावले उचलतील.संविधानाच्या स्वीकाराला 75 वर्ष झाल्यानिमित्त लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधले पंतप्रधानांचे संबोधन
December 14th, 05:50 pm
आपणा सर्वांसाठी आणि सर्व देशवासीयांसाठी इतकेच नव्हे तर जगभरातल्या लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही वेळ आहे. संविधानाचा 75 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आणि जगातल्या सर्वात महान आणि विशाल लोकशाहीचा प्रवास, यामागे असलेली आपल्या संविधान निर्मात्यांची दूर दृष्टी, आपल्या संविधान निर्मात्यांचे योगदान घेऊन आपण आज आगेकूच करत आहोत. 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे.संसदही या उत्सवात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करत आहे याचा मला आनंद आहे. मी सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो. ज्यांनी या उत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला केले संबोधित
December 14th, 05:47 pm
संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विशेष चर्चासत्राला संबोधित केले. आपण लोकशाहीचा हा उत्सव साजरा करत आहोत, ही भारतातील सर्व नागरिकांसाठी आणि लोकशाहीचा आदर करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे असे उद्गार मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना काढले. आपल्या राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या या उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण प्रवासात आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांची दूरदृष्टी, द्रष्टेपणाचे आणि प्रयत्नांचे आभार मानून ते म्हणाले की, 75 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. हा सोहळा साजरा करण्यात संसद सदस्यही सहभागी होत आहेत आणि आपले विचार व्यक्त करत आहेत याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला तसेच त्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.