Cabinet approves the Digital Agriculture Mission today with an outlay of Rs. 2817 Crore, including the central share of Rs. 1940 Crore

September 02nd, 06:30 pm

The Union Cabinet Committee chaired by the Prime Minister Shri Narendra Modi approved the Digital Agriculture Mission today with an outlay of Rs. 2817 Crore, including the central share of Rs. 1940 Crore.

तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या उदघाटन सत्रात नेत्यांच्या सत्राच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 17th, 12:00 pm

आपणा सर्वांचे बहुमूल्य विचार आणि सूचनांसाठी मी आपले हार्दिक आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या समान चिंता आणि महत्त्वाकांक्षा समोर मांडल्या. आपणा सर्वांच्या विचारांवरून हे स्पष्ट आहे की ग्लोबल साऊथ देशांमध्ये एकजूट आहे.

कॉप-28 परिषदेत ‘ट्रान्सफॉर्मिंग क्लायमेट फायनान्स’ या विषयावरील सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 01st, 08:06 pm

भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदांतर्गत शाश्वत विकास आणि हवामान बदल या दोन्ही विषयांना मोठे प्राधान्य दिले आहे.

राष्ट्रीय रोजगार मेळ्यात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

April 13th, 10:43 am

आज बैसाखीचा पवित्र सण आहे. मी सर्व देशवासियांना बैसाखी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.या आनंदोत्सवात आज 70 हजारांहून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागात सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

पंतप्रधानांचे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधन

April 13th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले.विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना त्यांनी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले नवनियुक्त भारत सरकारच्या अंतर्गत विविध पदांवर/ हुद्द्यांवर जसे की ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर ड्रॉफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस, इत्यादी विविध पदांवर रुजू होतील. विविध सरकारी विभागांमधील नवनियुक्त कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमाद्वारे, स्वयं प्रशिक्षण घेऊ शकतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान 45 ठिकाणे मेळ्याशी जोडली गेली होती.

वित्तीय क्षेत्राशी निगडीत अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 07th, 10:14 am

अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या माध्यमातून सरकार अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त स्वामित्व आणि समान भागीदारीचा एक मजबूत मार्ग तयार करीत आहे. या वेबिनारमध्ये तुम्हा लोकांचे विचार आणि तुमच्या शिफारसी यांना खूप महत्व आहे. आपल्या सर्वांचे या वेबिनारमध्ये मी खूप-खूप स्वागत करतो.

'विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे' या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 07th, 10:00 am

'विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे' या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मते आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्प पश्चात वेबिनारच्या मालिकेतील हे दहावे वेबिनार आहे.

भारताच्या अध्यक्षतेखालील G20 देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाचा मजकूर

February 24th, 09:25 am

मी जी 20 अर्थमंत्र्यांचे आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांचे भारतात स्वागत करतो. तुमची बैठक ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील मंत्री-स्तरीय संवादाची पहिलीच बैठक आहे. फलदायी बैठकीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांची मला जाणीव आहे. जग गंभीर आर्थिक अडचणींना तोंड देत असताना तुम्ही जागतिक वित्त आणि अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करता. कोविड साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेला या शतकात न भूतो न भविष्यती असा धक्का दिला आहे. अनेक देश, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था, अजूनही त्याच्या परिणामांचा सामना करत आहेत. आपण जगाच्या विविध भागांमध्ये वाढत्या भौगोलिक - राजकीय तणावाचे साक्षीदार आहोत. जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय येत आहेत. दरवाढीमुळे अनेक समुदाय त्रस्त आहेत. आणि, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा ही जगभरातील प्रमुख चिंता बनली आहे. अनेक देशांची आर्थिक व्यवहार्यता देखील अनिश्चित कर्ज पातळीमुळे धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवरील विश्वास देखील उडाला आहे. ते स्वतःमध्ये सुधारणा करण्यात खुपच धीमे आहेत, काही अंशी हे देखील याचे कारण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता, आत्मविश्वास आणि वृद्धी परत आणणे हे आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालींचे संरक्षक असलेल्या तुमच्यावर अवलंबून आहे. हे काही सोपे काम नाही.

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या पहिल्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित.

February 24th, 09:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाखालील देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यात झाले दूरध्वनी संभाषण

September 09th, 07:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान, जोनास गहर स्टोर यांच्याशी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.

मालदिवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत भारत दौऱ्यातील फलनिष्पत्तींची यादी

August 02nd, 10:20 pm

ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा पहिला टप्पा- 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा भारत अर्थसहाय्यित प्रकल्प- कायमस्वरूपी कामांची सुरूवात

अमेरिकेच्या राष्ट्राध्‍यक्षांबरोबर झालेल्या व्दिपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रारंभीचे निवेदन

May 24th, 05:29 pm

श्रीयुत राष्ट्राध्‍यक्ष, तुम्हाला भेटून नेहमीच खूप आनंद होतो. आज आपण दोघे आणखी एका सकारात्मक आणि उपयुक्त क्वाड शिखर परिषदेमध्‍येही सहभागी झालो.

पंतप्रधानांनी भूषविले टोकियोमध्ये व्यापार गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान

May 23rd, 04:12 pm

जपानच्या 34 कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. यापैकी बहुतांश कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली असून, त्यांचा कारभारही भारतात चालतो. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, अर्धवाहक, पोलाद, तंत्रज्ञान, व्यापार, बँकिंग आणि वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपन्या काम करतात. भारतातील आणि जपानमधील व्यापारविषयक महत्त्वाच्या संस्था- जसे- केडॅन्रन, जेट्रो म्हणजेच जपानी परकीय व्यापार संघटना, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य बँक, जपान-भारत व्यापार सल्ला समिती आणि इन्व्हेस्ट इंडिया- या संस्थाही यात सहभागी झाल्या होत्या.

PM Modi's remarks at joint press meet with Nepal PM Deuba

April 02nd, 01:39 pm

Prime Minister Narendra Modi's remarks at joint press meet with Nepal Prime Minister Sher Bahadur Deuba

'विकासासाठी वित्तपुरवठा आणि आकांक्षी अर्थव्यवस्था' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण

March 08th, 02:23 pm

सर्वप्रथम, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिमानाची बाब म्हणजे आपण आज अर्थसंकल्पा संदर्भात चर्चा करत आहोत, तेंव्हा भारतासारख्या विशाल देशाच्या अर्थमंत्री देखील एक महिला आहेत, त्यांनी यावेळी देशाचा मोठा प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केला आहे.

‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण

March 08th, 11:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलेले हे या प्रकारचे, दहावे वेबिनार होते.

Today's new India emphasizes on solving problems rather than avoiding them: PM Modi

December 12th, 10:43 am

Prime Minister Narendra Modi addressed a function on “Depositors First: Guaranteed Time-bound Deposit Insurance Payment up to Rs. 5 Lakh” in New Delhi. He said, Banks play a major role in the prosperity of the country. And for the prosperity of the banks, it is equally important for the depositors' money to be safe. If we want to save the bank, then depositors have to be protected.

दिल्लीत झालेल्या बँक ठेवी विमा कार्यक्रमात पंतप्रधानांचा ठेवीदारांशी संवाद

December 12th, 10:27 am

नवी दिल्लीत आज झालेल्या, “ठेवीदार प्रथम: पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमीपात्र कालबद्ध ठेवी विमा परतावा योजना” या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही धनादेश, ठेवीदारांना परत करण्यात आले.

बँक ठेव विमा कार्यक्रमात उद्या पंतप्रधान ठेवीदारांना संबोधित करणार

December 11th, 09:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनात 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता “डिपॉझिटर्स फर्स्ट: गॅरंटिड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट अपटू रुपीस 5 लाख” (ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंत कालनिर्धारित ठेवी विमा भरणा हमी) या कार्यक्रमाला संबोधित करतील.

इन्फिनिटी फोरम 2021 च्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

December 03rd, 11:23 am

तंत्रज्ञान आणि आर्थिक विश्वातील माझे सहकारी नागरीक, आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले 70 देशांमधील हजारो नागरीक,