Congress has always followed the formula of divide and get power: PM Modi
October 09th, 01:09 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone for various development projects in Maharashtra worth over Rs 7600 crore via video conference today. The projects of today include the foundation stone laying of the upgradation of Dr Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur and the New Integrated Terminal Building at Shirdi Airport. Shri Modi also launched the operationalization of 10 Government Medical Colleges in Maharashtra and inaugurated the Indian Institute of Skills (IIS), Mumbai and Vidya Samiksha Kendra (VSK) of Maharashtra.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली
October 09th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्कील्स(IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले.शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला आणि स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी कृषीउन्नती योजनेला (KY) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 03rd, 09:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना (CSS) चे दोन छत्री योजनांमध्ये-पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना मध्ये सुसूत्रीकरण करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.वर्ष 2024-25 ते 2030-31 साठी ‘राष्ट्रीय खाद्यतेल - तेलबिया अभियान’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 03rd, 09:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल (एनएमईओ) - तेलबिया अभियानाला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देणे आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे . 2024-25 ते 2030-31 या सात वर्षांच्या कालावधीत 10,103 कोटी रुपये खर्चासह या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 20th, 11:45 am
दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित
September 20th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.गुजरात मध्ये गांधीनगर इथे रि-इन्व्हेस्ट 2024 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 16th, 11:30 am
गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडूजी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजन लाल शर्माजी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादवजी…. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीजी सुद्धा इथे दिसत आहेत, गोव्याचे मुख्यमंत्रीही आहेत आणि अनेक राज्यांचे ऊर्जामंत्रीही मला दिसत आहेत.त्याचप्रमाणे, परदेशी पाहुणे, जर्मनीच्या आर्थिक सहकार्य मंत्री, डेन्मार्कचे उद्योग व्यवसाय मंत्री, माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद जोशी, श्रीपाद नाईकजी आणि जगातील अनेक देशांमधून आलेले सर्व प्रतिनिधी, स्त्री-पुरुष सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे केले चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन
September 16th, 11:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन केले. ही तीन-दिवसीय शिखर परिषद भारताच्या 200 GW पेक्षा जास्त स्थापित बिगर-जीवाश्म इंधन क्षमता साध्यतेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करत आहे. मोदी यांनी यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनास्थळी पायी चालत आढावाही घेतला.शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि निर्णय घेतले जातील - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
September 14th, 08:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबध्द आहे, यावर भर दिला.Cabinet approves the Digital Agriculture Mission today with an outlay of Rs. 2817 Crore, including the central share of Rs. 1940 Crore
September 02nd, 06:30 pm
The Union Cabinet Committee chaired by the Prime Minister Shri Narendra Modi approved the Digital Agriculture Mission today with an outlay of Rs. 2817 Crore, including the central share of Rs. 1940 Crore.'कृषी पायाभूत सुविधा निधी' या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या क्रमशः विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 28th, 05:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ अंतर्गत वित्तपुरवठा सुविधेच्या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या क्रमशः विस्ताराला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे ती अधिक आकर्षक, प्रभावशाली आणि सर्वसमावेशक होईल.शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार वचनबद्ध : पंतप्रधान
August 12th, 11:21 am
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.एकात्मिक फलोत्पादन विकासासाठी मिशन अंतर्गत स्वच्छ रोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 09th, 10:17 pm
1765.67 कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीने राबवण्यात येणाऱा हा अग्रणी उपक्रम, भारतातील फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे आणि उत्कृष्टता आणि शाश्वततेचे नवे मापदंड प्रस्थापित करण्याची अपेक्षा आहे.आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 03rd, 09:35 am
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन
August 03rd, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 22nd, 10:30 am
आज श्रावणातील पहिला सोमवार आहे.आजच्या पवित्र दिवशी एका महत्त्वपूर्ण सत्राचा प्रारंभ होत आहे आणि श्रावणातील या पहिल्या सोमवारच्या देशवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांसोबत साधला संवाद
July 22nd, 10:15 am
तब्बल 60 वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच एखादे सरकार सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून आल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. एखाद्या सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करणे ही एक अभूतपूर्व घटना असून, अवघा देश ती अनुभवतो आहे असे पंतप्रधान म्हणाले. हा अर्थसंकल्प अमृत काळातील मैलाचा दगड ठरणार असून, आम्ही गेल्या काही काळात नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प आपल्या नेतृत्वातील सध्याच्या सरकारच्या पुढच्या पाच वर्षांच्या वाटचालीची दिशा ठरवेल तसेच 2047 सालापर्यंत विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नाचा भक्कम पाया रचेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.INDI alliance has ruined both industry and agriculture in Punjab: PM Modi in Hoshiarpur, Punjab
May 30th, 11:53 am
Prime Minister Narendra Modi concluded his 2024 election campaign with a spirited public rally in Hoshiarpur, Punjab, paying homage to the sacred land of Guru Ravidas Ji and emphasizing his government's commitment to development and heritage preservation.PM Modi addresses a public meeting in Hoshiarpur, Punjab
May 30th, 11:14 am
Prime Minister Narendra Modi concluded his 2024 election campaign with a spirited public rally in Hoshiarpur, Punjab, paying homage to the sacred land of Guru Ravidas Ji and emphasizing his government's commitment to development and heritage preservation.