केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या कालावधीसाठी साखर कारखान्यांनी देय असलेल्या उसाच्या 'रास्त आणि किफायतशीर किंमत' (FRP) ला दिली मंजुरी
February 21st, 11:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी 10.25% मूळ वसुलीसाठी 340 रुपये प्रति क्विंटल या दराने उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला (एफआरपी) मंजुरी दिली आहे. उसाला मिळालेला हा ऐतिहासिक भाव असून चालू हंगाम 2023-24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा तो सुमारे 8 टक्क्यांनी जास्त आहे. एफआरपीचे सुधारित दर यावर्षी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील.