निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी ईसीजीसी लिमिटेड अर्थात निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितमध्ये पाच वर्षात 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली सहाय्याला केंद्र सरकारची मान्यता
September 29th, 04:18 pm
निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उपायांची मालिका हाती घेतली आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने निर्यात पत हमी महामंडळ मर्यादित मध्ये ( याआधी भारतीय निर्यात पत हमी महामंडळ ओळखले जाणारे) पाच वर्षात म्हणजेच वित्तीय वर्ष 2021-2022 ते वित्तीय वर्ष 2025- 2026 या काळात 4,400 कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याला मंजुरी दिली आहे.