एक्स्पो 2020 दुबई इथे भारतीय दालनातल्या उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
October 01st, 08:55 pm
एक्स्पो 2020 दुबई इथल्या भारतीय दालनात स्वागत. हे ऐतिहासिक प्रदर्शन आहे. मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया क्षेत्रात होणारे हे पहिले प्रदर्शन आहे. मोठ्या दालनापैकी एका दालनासह भारत यामध्ये सहभागी होत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबई समवेत असलेले प्रदीर्घ आणि ऐतिहासिक संबंध हे प्रदर्शन अधिक दीर्घ करेल असा मला विश्वास आहे. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक महामहीम शेख खलीफा बिन झायेद बिन अल नाह्यान यांना भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊन मी सुरुवात करतो.दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांनी दिलेला संदेश
October 01st, 08:54 pm
दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पव्हेलियनला दिलेल्या संदेशात या प्रदर्शनाला ऐतिहासिक असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियाई प्रदेशात प्रथमच हे प्रदर्शन भरत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबईशी असलेले आमचे दृढ आणि ऐतिहासिक नातेसंबंध अधिक चांगल्या पद्धतीने जपण्यासाठी हे प्रदर्शन दीर्घकाळ मदत करेल.” पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे राज्यकर्ते महामहीम शेख खलिफा बिन झायेद बिन अल् नह्यान तसेच संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन रशिद अल् मक्तोम यांचे अभिनंदन केले. “आपल्या धोरणात्मक भागीदारीबाबत प्रगती करण्यात दोन्ही देशांना जे यश मिळाले आहे त्यासाठी राजपुत्र महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल् नह्यान यांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे, दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धी साधण्यासाठी आपण असेच एकत्रितपणे काम करत राहू अशी अशा मी व्यक्त करतो,” असे गौरवोद्गार काढत पंतप्रधानांनी राजपुत्र महोदयांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
September 03rd, 10:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नहियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. कोविड -19 महामारी दरम्यान भारतीय समुदायाला संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या मदतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 1 ऑक्टोबर 2021 पासून दुबईत आयोजित एक्स्पो -2020 साठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.