पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण
October 05th, 10:31 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्घाटन
October 05th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
September 03rd, 10:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नहियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. कोविड -19 महामारी दरम्यान भारतीय समुदायाला संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या मदतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 1 ऑक्टोबर 2021 पासून दुबईत आयोजित एक्स्पो -2020 साठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या ‘आरई -इन्व्हेस्ट 2020’ मध्ये केलेले भाषण
November 26th, 05:27 pm
आपल्या सर्वांना ‘नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो आरई-इन्व्हेस्ट’च्या तिस-या आवृत्तीमध्ये सहभागी होताना पाहणे, एक खूप चांगला अनुभव आहे. याआधीच्या आवृत्तींमध्ये आपण नवीकरणीय ऊर्जेचा मेगावॅट ते गिगावॅटपर्यंतच्या प्रवासाविषयी ,आमच्या योजनांबद्दल चर्चा केली. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ‘‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड अर्थात “एक सूर्य, एक जग, एक ग्रिड”या विषयावरही आपण बोललो होतो. अतिशय अल्प काळामध्ये त्यापैकी अनेक योजना प्रत्यक्षात येत आहेत.पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो ”री-इन्व्हेस्ट 2020 ”चे केले उद्घाटन
November 26th, 05:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिसऱ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो (री-इन्व्हेस्ट 2020) चे उद्घाटन केले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ही शिखर परिषद आयोजित केली आहे. ‘शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन ’ ही री -इन्व्हेस्ट 2020 ची संकल्पना आहे."मोदी Astana एक्सपो 2017 मध्ये उपस्थित "
June 09th, 07:46 pm
कझाकस्तानमधील अस्ताना एक्सपो 2017 च्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपस्थिती नोंदविली. प्रदर्शनाची संकल्पना फ्यूचर एनर्जी होती