पंतप्रधान 6 डिसेंबर रोजी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे करणार उद्घाटन
December 05th, 06:28 pm
ईशान्य भारतातील सांस्कृतिक चैतन्य प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दुपारी 3 वाजता अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 30th, 12:00 pm
भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर श्री शक्तिकांत दास जी, नियामक मंडळ सदस्य ख्रिस गोपालकृष्णनजी, वित्त उद्योगातील नेते, फिनटेक आणि स्टार्ट-अप जगतातील माझे सहकारी, इतर सर्व मान्यवर, भगिनी आणि सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला केले संबोधित
August 30th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित केले. यावेळी आयोजित प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे ग्लोबल फिनटेक फेस्ट चे आयोजन केले आहे. फिनटेकमधील भारताची प्रगती प्रदर्शित करणे आणि या क्षेत्रातील प्रमुख हितधारकांना एकत्र आणणे हे याचे उद्दिष्ट आहे.VDNKh येथील रोसाटॉम पॅव्हेलियनला पंतप्रधानांनी दिली भेट
July 09th, 04:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत आज मॉस्को येथील ऑल रशियन प्रदर्शन केंद्र, VDNKhला भेट दिली.नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 26th, 11:10 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियूष गोयल जी, दर्शना जरदोश जी, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, फॅशन आणि वस्त्रोद्योग जगताशी संबंधित सर्व मित्र, तरुण उद्योजक, विद्यार्थी, आपले विणकर आणि आपल्या कारागीर मित्रांनो महोदया आणि महोदय! भारत मंडपम येथे आयोजित भारत टेक्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत ! आजचा हा कार्यक्रम खूप विशेष आहे. विशेष यासाठी आहे : कारण भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये म्हणजेच भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी होत आहे. आज 3 हजाराहून अधिक प्रदर्शक... 100 देशांतील सुमारे 3 हजार खरेदीदार... 40 हजारांहून अधिक व्यापारी अभ्यागत... एकाचवेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग कार्यक्षेत्रामधील सर्व भागधारकांना आणि संपूर्ण मूल्य साखळीतील लोकांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन
February 26th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनाची देखील पंतप्रधानांनी पाहणी केली.भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 या भारतातल्या परिवहन विषयक विशाल आणि अशा प्रकारच्या पहिल्या प्रदर्शनातील एका कार्यक्रमाला पंतप्रधान 2 फेब्रुवारीला करणार संबोधित
February 01st, 03:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 फेब्रुवारी 2024ला, भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 या भारतातल्या परिवहन विषयक विशाल आणि अशा प्रकारच्या पहिल्या प्रदर्शनात एका कार्यक्रमाला संबोधित करतील. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे संध्याकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.