कार्यकर सुवर्ण महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 07th, 05:52 pm
या कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवानिमित्त मी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणी प्रणाम करतो. आज प्रमुख स्वामी महाराजांच्या 103 व्या जयंतीचा महोत्सवदेखील आहे. गुरुहरी प्रगट ब्रह्म स्वरूप प्रमुख स्वामी महाराजांना मी नमन करतो. भगवान स्वामी नारायण यांची शिकवण, प्रमुख स्वामी महाराजांचे संकल्प... आज परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे सिद्धीस जात आहे. हा एवढा भव्य कार्यक्रम, एक लाख कार्यकर्ता, युवा आणि मुलांद्वारे बीज, झाडे आणि फळे यांचे सार अभिव्यक्त करणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम...... भलेही मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, परंतु या कार्यक्रमाची ऊर्जा मला माझ्या हृदयात जाणवत आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज आणि सर्व संतांचे अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो.अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर सुवर्ण महोत्सवाला केले मार्गदर्शन
December 07th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबाद येथील कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज, आदरणीय संत, आणि सत्संगी परिवाराचे सदस्य आणि अन्य सन्माननीय व्यक्तींचे स्वागत केले, व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यकर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणकमलांना वंदन केले आणि प्रमुख स्वामी महाराज यांची आज एकशे तीनवी जयंती असल्याचेही स्मरण त्यांनी केले. परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे भगवान स्वामी नारायण यांची शिकवण आणि प्रमुख स्वामी महाराज यांची वचने आज फळाला येत आहेत. जवळपास एक लाख कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेत, तरुणांचे व बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून भरवलेल्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते स्वतः या कार्यक्रमस्थळी उपस्थित नसले तरी ते त्यातील ऊर्जेचा अनुभव घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उच्च कोटीच्या दैवी समारंभाबद्दल त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांचे आणि सर्व संतांचे अभिनंदन केले.फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 14th, 05:45 pm
फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या 13 ते15 सप्टेंबर या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. द्विपक्षीय आणि परस्पर हितसंबंधांच्या इतर मुद्यांवर दोघांनी चर्चा केली. तसेच कोलोना यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा मैत्री आणि सहकार्याचा संदेश मोदी यांना दिला. पॅरिस आणि जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या अलीकडच्या भेटींच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला आणि मॅक्रॉन लवकरात लवकर भारतभेटीवर यावेत, अशी इच्छा व्यक्त केली.जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 06th, 02:08 pm
आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे.जीतो कनेक्ट 2022 च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
May 06th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या 'जीतो कनेक्ट 2022' च्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
August 31st, 08:41 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.उपराष्ट्रपती आणि युरोपियन उच्चालय प्रतिनिधी जोसेफ बोरेल फॉन्टेलेस यांनी पंतप्रधानांशी साधला दूरध्वनीद्वारे संवाद
January 17th, 09:13 pm
जोसेफ बोरेल फॉन्टेलेस, युरोपचे उच्च प्रतिनिधी तसेच उपराष्ट्रपती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. बोरेल 16 ते 18 जानेवारीदरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून ते रायमाना वार्ता 2020 ला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण करतील. 1 डिसेंबर 2019 ला युरोपियन संघराज्याच्या एचआरपीव्ही या पदावर नियुक्त झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच विदेश यात्रा आहे.Telephone Conversation of Prime Minister with H.E. Ms. Ursula von der Leyen, President of the European Commission
December 02nd, 07:48 pm
PM had a telephonic conversation with H.E. Ms. Ursula von der Leyen, President of the European Commission. The PM pointed out that India-EU partnership was based on shared values like democracy, respect for rule of law, multilateralism, rules-based trade and rules-based international order.PM Modi interacts with Swedish CEOs, highlights investment opportunities in India
April 17th, 05:52 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with Swedish CEOs. He discussed trade and business ties between both the nations. Stating that Sweden was a valued partner for ‘Make in India’ initiative, PM Modi highlighted various investment opportunities in India.स्वीडनभेटीदरम्यानपंतप्रधानांनीमाध्यमांनादिलेलेनिवेदन (एप्रिल 17, 2018)
April 17th, 04:50 pm
ही माझी स्वीडनची पहिलीच भेट. भारताच्या पंतप्रधानांची स्वीडन भेट जवळपास तीन दशकानंतर होत आहे. स्वीडनमध्ये माझ्या खूपच उल्हासाने करण्यात आलेल्या स्वागत आणि सन्मानासाठी मी पंतप्रधान स्टीफन लोवेन आणि स्वीडनच्या जनतेचे अंतःकरणातून आभार मानतो. माझ्या या भेटी दरम्यान लोवेन यांनी अन्य नॉर्डिक देशांसह भारताच्या परिषदेचे ही आयोजन केले आहे. यासाठीही मी पंतप्रधानांचे हृदयापासून स्वागत करतो.नारी शक्ती समाजातल्या अडथळ्यांना दूर करीत आहे: मन की बात मध्ये पंतप्रधान
January 28th, 11:45 am
यावर्षीच्या पहिल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सशक्तीकरण, स्वच्छता, जन औषधी केंद्र, आणि पद्म पुरस्कारांबद्दल विस्तारपूर्वक बोलले. त्यांनी महात्मा गांधी यांचे स्मरण केले आणि त्यांचा शांतता आणि अहिंसेवरच विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. जर आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालत राहिलो तर ती त्यांना सर्वात चांगली श्रद्धांजली ठरेल असे पंतप्रधानांनी म्हटले.दावोसला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
January 21st, 09:04 pm
भारताचे चांगले मित्र आणि जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक प्रा. क्लाउस श्वाब यांच्या निमंत्रणावरुन दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत प्रथमच सहभागी होत असून मी उत्सुक आहे. यावर्षीच्या परिषदेची संकल्पना “दुभंगलेल्या जगात समाईक भवितव्याची निर्मिती” असून ती अगदी समर्पक आणि योग्य आहे.Press statement by PM during India-EU Summit
October 06th, 02:45 pm
PM Narendra Modi met Mr. Donald Tusk, President of European Council and Mr. Jean-Claude Juncker, President, European Commission today and reviewed bilateral and strategic partnership. During the joint press statements, PM Modi expressed India's will to further enhance ties with the European Union at global level.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते स्टार्ट अप पोर्टलचे उदघाटन
June 24th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांनी आज भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप हब चे (आयपीआयएसएच) लिस्बन इथे उदघाटन केले.स्टार्ट अप इंडिया द्वारे पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या या मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि स्टार्ट अप पोर्तुगाल यांचे पाठबळ आहे.उद्योजकतेसाठी भागीदारी करण्याच्या दृष्टीने हा मंच निर्माण करण्यात आला आहे.Terrorism a challenge to entire humanity: PM Modi in Brussels
March 31st, 02:01 am
India is the lone light of hope amidst global slowdown: PM Modi at Community event in Brussels
March 31st, 02:00 am
PM Modi attends 13th India-EU Summit
March 30th, 10:28 pm
A combination of Belgian capacities & India’s economic growth can produce promising opportunities for both sides: PM
March 30th, 07:13 pm
Nothing is impossible, once efforts are coordinated: PM
March 30th, 07:12 pm
PM Modi pays homage to Brussels terror attack victims
March 30th, 05:00 pm