भारतीय अंतराळ संघटनेचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 11th, 11:19 am
भविष्यासाठीच्या आपल्या योजना, आपल्या कल्पना ऐकून, आपणा सर्वांचा हुरूप बघून माझा उत्साहही द्विगुणीत झाला आहे.पंतप्रधानांनी भारतीय अवकाश संघटनेची सुरुवात केली
October 11th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज आयएसपीए अर्थात भारतीय अवकाश संघटनेची औपचारिक सुरुवात केली. याप्रसंगी त्यांनी अंतराळ क्षेत्राशी निगडीत प्रतिनिधींशी संवाद देखील साधला.शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेच्या 21 व्या शिखर संमेलनातले पंतप्रधानांचे संबोधन
September 17th, 12:22 pm
सर्वप्रथम मी राष्ट्रपती रहमोन यांना एससीओ परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा देतो. ताजिक प्रेसिडेंसीने आव्हानपूर्ण जागतिक आणि क्षेत्रीय वातावरणात या संघटनेचं कौशल्याने संचालन केलं आहे. ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 30 व्या वर्षानिमित्ताने, मी संपूर्ण भारतातर्फे सर्व ताजिक बंधू भगीनी आणि राष्ट्रपती रहमोन यांना खूप खूप शुभेच्छा देतो.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 05th, 01:01 pm
आज आपल्या सर्वांशी संवाद साधून खूप समाधान वाटले.समाधान याचे की दिल्लीहून धान्याचा जो एकेक दाणा पाठवला होता, तो प्रत्येक लाभार्थ्याच्या ताटात पोचतो आहे. समाधान याचेही, की आधीच्या सरकारांच्या काळात, उत्तरप्रदेशात गरिबांच्या अन्नाची जी लूट होत होती, त्यासाठी आता कुठलाही मार्ग उरलेला नाही. उत्तरप्रदेशात आता ज्या प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलबजावणी केली जात आहे, ती नव्या उत्तरप्रदेशाची ओळख आणखी भक्कम करत आहे. मला तुमच्याशी बोलतांना खूप आनंदही होत होता. ज्या हिमतीने आपण सगळे बोलत होतात, ज्या विश्वासाने बोलत होता, त्यामुळे फार चांगले वाटले. तसेच, आपल्या प्रत्येक शब्दातून सच्चेपणा जाणवत होता. त्यामुळेही मला खूप समाधान मिळाले. आपल्या सर्वांसाठी काम करण्याचा माझा उत्साह आज आणखी दुणावला आहे. चला, आपण अशा गप्पा कितीही वेळ मारू शकतो, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.पंतप्रधानांचा उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद
August 05th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.ई-रुपी डिजिटल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 02nd, 04:52 pm
या महत्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्ट अप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारी गण, आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,पंतप्रधानांनी e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा केला प्रारंभ
August 02nd, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे e-RUPI या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचा प्रारंभ केला. डिजिटल पेमेंटसाठी e-RUPI हे रोकडरहित आणि संपर्क विरहीत साधन आहे.