पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे भूषवणार अध्यक्षस्थान
December 13th, 12:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल.जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन आणि विकासाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाची बायो राईड योजनेला मंजुरी
September 18th, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान विभागाच्या दोन योजनांचे विलीनीकरण करून ‘जैवतंत्रज्ञान संशोधन नवकल्पना आणि उद्योजकता विकास (बायो-राइड)’ या योजनेला जैव-उत्पादन आणि जैव-प्रक्रिया या नवीन घटकांसह मंजुरी दिली.प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:20 pm
देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.पीएम-सूरज पोर्टलच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 13th, 04:30 pm
सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजी, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी, इतर मान्यवर, सभ्य स्त्री-पुरुषहो, देशातील 470 जिल्ह्यांतून जवळजवळ 3 लाख लोक आज या कार्यक्रमाशी थेट जोडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटकांना कर्जाचे पाठबळ देण्यासाठीच्या देशव्यापी संपर्क मोहिमे निमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
March 13th, 04:00 pm
मध्य प्रदेश मधील इंदूर येथील नरेंद्र सेन हे क्लाऊड कॉम्प्युटिंगशी संबंधित इंटरनेट कंपनीचे संस्थापक आहेत. सायबर कॅफेचा मालक, ते कोडिंग शिकणे आणि पुढे कंपनीचे संस्थापक होण्यापर्यंतचा आपला प्रवास त्यांनी पंतप्रधानांसमोर उलगडला. त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की सूक्ष्म-लघु-मध्यम (MSME) उद्योगांचे डिजिटलायझेशन करून त्यांचे सक्षमीकरण करणे, हे त्यांचे ध्येय आहे. दुसऱ्या नरेंद्रची कहाणी जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी हलक्याफुलक्या संवादा द्वारे केलेल्या विनंतीवर, सेन यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की ते एका खेडेगावातील आहेत, पण त्यांच्या कुटुंबाने इंदूरला स्थलांतर केले, आणि वाणिज्य क्षेत्रातील पार्श्वभूमी असूनही त्यांना तंत्रज्ञानामध्ये खूप रस आहे. ते पुढे म्हणाले की नॅसकॉमच्या एका कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे भाषण आणि भारतातील क्लाऊड गोदामाची मागणी, यामुळे त्यांना क्लाऊड कॉम्प्युटिंगवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. “गावात बसलेल्या एका नरेंद्रला दुसऱ्या नरेंद्राकडून प्रेरणा मिळाली”, सेन म्हणाले. सरकारी स्तरावरील आव्हाने आणि मदतीबद्दल पंतप्रधानांनी विचारल्यावर सेन म्हणाले की त्यांच्या मदतीची विनंती तत्कालीन माहिती तंत्रज्ञान सचिवांनी मंजूर केली, ज्यामुळे भारतातील पहिले डेटा सेंटर पार्क विकसित झाले. सेन आणि इतर तरुणांनी स्टार्टअप्समध्ये रस घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये अतिरिक्त उपक्रमांचा समावेश करण्याची परवानगी दिली
February 21st, 11:29 pm
व्यक्ती,एफपीओ, एसएचजी,जेएलजी,एफसीओ आणि विभाग 8 अंतर्गत समाविष्ट कंपन्यांना घोडा ,गाढव, खेचर, उंट यांच्याशी संबंधित व्वसायासाठी 50% भांडवल अनुदानासह जास्तीतजास्त 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. तसेच घोडा,गाढव आणि उंट या पशुंच्या प्रजनन संवर्धनासाठी राज्य सरकारला मदतनिधी दिला जाईल. घोडा,गाढव आणि उंट यांची वीर्य केंद्रे आणि न्युक्लिअस प्रजनन फार्म उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून 10 कोटी रुपये देण्यात येतीलकिन्नर काय करु शकतात, हे आपण आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे, ही खूप मोठी सेवा आहे, मुंबईतल्या किन्नर,कल्पना यांच्याविषयी पंतप्रधानांचे गौरवोद्गार
January 18th, 04:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी या संवादात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीतील सहभागींसोबत झालेल्या संवादात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
December 19th, 11:32 pm
खरेच तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटले . देशासमोरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातील तरुण पिढी अहोरात्र काम करत आहे ,याचा मला आनंद आहे. आधीच्या हॅकॅथॉनमधून मिळालेले उपाय खूप प्रभावी ठरले आहेत. हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअपही सुरू केले आहेत. हे स्टार्टअप्स, हे उपाय सरकार आणि समाज दोघांनाही मदत करत आहेत. आज या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी केले संबोधित
December 19th, 09:30 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 27th, 11:30 am
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.G20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रीस्तरीय बैठकीमध्ये पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
August 19th, 11:05 am
गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतात घडून आलेले डिजिटल परिवर्तन अभूतपूर्व आहे. 2015 साली आम्ही सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमापासून हा प्रवास सुरु झाला. या प्रवासाला आमच्या नवोन्मेषावरील अढळ विश्वासाचे बळ लाभले आहे. आमच्या जलद अंमलबजावणीच्या वचनबद्धतेने आणि, आमच्या सर्वसमावेशकता, कोणालाही मागे न सोडण्याच्या भावनेने ते प्रेरित आहे. या परिवर्तनाचे प्रमाण, वेग आणि व्याप्ती कल्पनेपलीकडची आहे. आज, भारतात 850 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत, जे जगातील सर्वात स्वस्त डेटाचा उपभोग घेत आहेत. प्रशासनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, ते अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक, जलद आणि पारदर्शक बनवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. डिजिटल ओळख असलेले आधार, हे अनोखे व्यासपीठ, आमच्या एक अब्ज तीस कोटी पेक्षा जास्त जनतेला सामावून घेत आहे. भारतात आर्थिक समावेशकतेची क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही आमच्या JAM, अर्थात जनधन बँक खाती, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीच्या सामर्थ्याचा वापर केला आहे. युपीआय (UPI), या आमच्या तत्काळ पेमेंट प्रणाली द्वारे महिन्याला, जवळजवळ 10 अब्ज व्यवहार होतात. जगातील थेट पेमेंटपैकी 45% पेक्षा जास्त व्यवहार भारतात होतात. सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेने सरकारी निधीची गळती थांबवली असून, जवळजवळ 33 अब्ज डॉलर्सची बचत केली आहे. कोविन (CoWIN) पोर्टलने भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेला बळ दिले. यामुळे डिजिटल पडताळणीयोग्य प्रमाणपत्रांसह 2 अब्ज पेक्षा जास्त लस मात्रा वितरित करता आल्या. गती-शक्ती व्यासपीठ, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकचा अंदाज घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि विशेष नियोजनाचा वापर करते. नियोजन, खर्च कमी करणे आणि वितरणाचा वेग वाढवणे, यामध्ये ते उपयोगी ठरत आहे. आमचे ऑनलाइन सार्वजनिक खरेदी व्यासपीठ, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ ने खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणली आहे. डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठीचे खुले नेटवर्क, ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण करत आहे. पूर्णत: डिजीटल करप्रणाली पारदर्शकतेला आणि ई-प्रशासनाला चालना देत आहे. भाषिणी, हे कृत्रिम बुद्धीमत्तेची जोड असलेले एक भाषांतर व्यासपीठ आम्ही निर्माण करत आहोत. हे व्यासपीठ भारतातील सर्व वैविध्यपूर्ण भाषांचे डिजिटल समावेशन सुलभ करेल.G20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 19th, 09:00 am
केले. देशातील अतुल्य विविधतेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारतामध्ये डझनभर भाषा आणि शेकडो बोली आहेत यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की जगभरातील प्रत्येक धर्म आणि असंख्य सांस्कृतिक प्रथा भारतात आहेत. प्राचीन परंपरांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, भारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. अशा विविधतेमुळे भारत ही संशोधनासाठी एक आदर्श चाचणी प्रयोगशाळा आहे, असे ते म्हणाले. भारतात यशस्वी होणारे संशोधन जगात कुठेही सहज वापरता येऊ शकते असे त्यांनी अधोरेखित केले. भारत आपले अनुभव जगासोबत सामायिक करण्यास तयार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आणि कोविड महामारीच्या काळात जागतिक कल्याणासाठी कोविन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याचे उदाहरण दिले. भारताने इंडिया स्टॅक हे ऑनलाइन ग्लोबल डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर रिपॉझिटरी तयार केले आहे जेणेकरून कोणीही विशेषतः ग्लोबल साउथमधील देश मागे राहणार नाहीत.अटल टिंकरिंग लॅब आपल्या तरुणांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना जागृत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात: पंतप्रधान
July 10th, 10:12 pm
अटल टिंकरिंग लॅब्स आपल्या तरुणांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना जागृत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.PM Modi and First Lady of the US Jill Biden visit the National Science Foundation
June 22nd, 02:49 am
PM Modi and First Lady of the US Jill Biden visited the National Science Foundation. They participated in the ‘Skilling for Future Event’. It is a unique event focused on promoting vocational education and skill development among youth. Both PM Modi and First Lady Jill Biden discussed collaborative efforts aimed at creating a workforce for the future. PM Modi highlighted various initiatives undertaken by India to promote education, research & entrepreneurship in the country.17 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन 2023
January 06th, 07:27 pm
प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) संमेलन हा भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून दिला आहे.मध्य प्रदेश राज्य सरकारच्या भागीदारीसह केंद्र सरकारने 08 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केले आहे. “भारतीय समुदाय: अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार” ही या वर्षीच्या पीबीडी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशांतील भारतीय समुदायांच्या साडेतीन हजारांहून अधिक सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी नोंदणी केली आहे.आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या जागतिक दुग्धव्यवसाय परिषद 2022 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 12th, 11:01 am
दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित जगभरातील तज्ञ आणि संशोधक या परिषदेसाठी एकत्र आले आहेत, याचा मला आनंद होत आहे. जागतिक डेअरी शिखर परिषदेमध्ये विविध देशांतून आलेल्या सर्व मान्यवरांचे भारतातील कोट्यवधी प्राण्यांच्या वतीने, भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या वतीने, भारत सरकारच्या वतीने मी मनःपूर्वक स्वागत करतो. “दुग्धव्यवसाय क्षेत्राचे खरे सामर्थ्य केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत नाही तर जगभरातील कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे देखील प्रमुख साधन आहे. मला विश्वास आहे, ही शिखर परिषद कल्पना, तंत्रज्ञान , कौशल्य आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित परंपरांच्या बाबतीत एकमेकांचे ज्ञान वाढवण्यात आणि एकमेकांकडून शिकण्यात मोठी भूमिका बजावेल.PM inaugurates International Dairy Federation World Dairy Summit 2022 in Greater Noida
September 12th, 11:00 am
PM Modi inaugurated International Dairy Federation World Dairy Summit. “The potential of the dairy sector not only gives impetus to the rural economy, but is also a major source of livelihood for crores of people across the world”, he said.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 जून रोजी ‘उद्यमी भारत’ कार्यक्रमात सहभागी होणार
June 28th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 जून 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे ‘उद्यमी भारत’ कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 'रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स' (RAMP) योजना, 'पहिल्यांदाच एमएसएमई निर्यातदारांची क्षमता वाढवणे' (CBFTE) योजना आणि 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम' (PMEGP) च्या नवीन वैशिष्ट्यांचा शुभारंभ करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वित्त मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताह समारंभाच्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण
June 06th, 10:31 am
गेल्या वर्षांमध्ये वित्त मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपल्या कार्याने, योग्यवेळी, योग्य निर्णय घेवून आपला एक वारसा तयार केला आहे. एक खूप उत्तम प्रवास केला आहे. तुम्ही सर्वजण या वारशाचे भाग आहात. देशातल्या सामान्य जनतेचे जीवन सुकर बनवायचे असो की, अर्थव्यवस्थेला सशक्त करायचे असो, गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक सहकारी मंडळींनी खूप मोठे योगदान दिले आहे.