शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणावरील जी 20 सत्रातील पंतप्रधानांचे भाषण

November 20th, 01:40 am

आजच्या सत्राची संकल्पना अतिशय प्रासंगिक आहे आणि भावी पिढीच्या भविष्याशी निगडित आहे. नवी दिल्ली जी -20 शिखर परिषदेदरम्यान, आपण शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देण्यासाठी वाराणसी कृती आराखडा स्वीकारला होता.

पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित जी20 सत्राला संबोधित केले

November 20th, 01:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 शिखर परिषदेतील शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित सत्राला संबोधित केले. नवी दिल्ली येथे आयोजित जी 20 शिखर परिषदेदरम्यान या गटाने वर्ष 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि उर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता याचा त्यांनी उल्लेख केला. या शाश्वत विकासविषयक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.