'भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया' कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केलेले संबोधन

March 13th, 11:30 am

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आपण इतिहास घडवला आहे, आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक खूप मोठे, ठोस पाउलही उचलले आहे. आज सेमी कंडक्टर उत्पादनाशी संबंधित जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयांच्या तीन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. गुजरातमधील धोलेरा आणि साणंद येथील सेमी-कंडक्टर सुविधा असो, की आसाममधील मोरीगाव येथील सेमी-कंडक्टर सुविधा, यामुळे भारताला सेमी-कंडक्टर उत्पादनाचे मोठे जागतिक केंद्र बनविण्यामध्ये मदत होईल. या महत्वाच्या उपक्रमासाठी, एका महत्वाच्या सुरुवातीसाठी, एक मजबूत पाउल उचलल्याबद्दल, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल, मी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात तैवानचे आमचे एक मित्र देखील दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले आहेत. भारताच्या या प्रयत्नांमुळे मलाही उत्साह वाटत आहे.

भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

March 13th, 11:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाला संबोधित केले आणि सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मुल्यांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली.यात गुजरात येथील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (डीएसआयआर ) येथे सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा आणि गुजरातमधील साणंद आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी)) सुविधा या सुविधांचा समावेश आहे.

धारवाड येथील इलेक्ट्रॉनिक उत्पादन समुहाचा धारवाड आणि परिसरातील लोकांना मोठा फायदा होईल: पंतप्रधान

March 25th, 11:17 am

धारवाड येथील इलेक्ट्रॉनिक उत्पादन समुहाचा धारवाड आणि परिसरातील लोकांना मोठा फायदा होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. यामुळे उत्पादन आणि नवनिर्मितीच्या जगात कर्नाटकच्या प्रगतीलाही चालना मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

‘हरित विकास’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन

February 23rd, 10:22 am

भारतात 2014 नंतर जेवढे अर्थसंकल्प सादर केले गेले त्या प्रत्येक अर्थसंकल्पात एक विशिष्ट असा प्रकार आढळतो. हा प्रकार असा आहे की आमच्या सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प, विद्यमान आव्हानांवर उपाययोजना करण्यासोबतच नव्या युगातील सुधारणांना वाव देत आला आहे. हरित विकास आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारताच्या धोरणाच्या डोलाऱ्याचे तीन प्रमुख खांब आहेत. पहिला खांब आहे नवीकरणीय म्हणजेच अपारंपरिक ऊर्जेचं उत्पादन वाढवणं. दुसरा खांब आहे आपल्या अर्थव्यवस्थेमधील जीवाश्म इंधनाचा उपयोग कमी करणं. आणि तिसरा खांब आहे वायु इंधनावर आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने आगेकूच करणं, थोडक्यात वायु इंधनाचा जास्तीत जास्त उपयोग करणं. याच धोरणा अंतर्गत, मग ते इथेनॉल मिश्रण असो, पीएम कुसुम योजना असो, सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणं असो, घरांच्या छतावर सौर ऊर्जेची तबकडी बसवण्याची योजना असो, कोळशापासून वायूनिर्मिती असो, बॅटरी संचय असो, गेल्या काही वर्षातील अर्थसंकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुद्धा उद्योगांसाठी हरित कर्जाची तरतूद आहे, तर शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीचा कस टिकवण्यावर भर देणारी पीएम प्रमाण

'हरित विकास' या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 23rd, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरित ऊर्जा या विषयावर आधारित अर्थसंकल्प-पश्चात वेबिनारला संबोधित केले. 2023 च्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सर्व संबंधितांच्या कल्पना आणि सल्ले जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प-पश्चात 12 वेबिनारच्या मालिकेतील हे पहिलेच वेबिनार होते.

The whole world is looking at India’s youth with hope: PM Modi

July 29th, 12:42 pm

PM Modi addressed the 42nd Convocation of Anna University in Chennai. The Prime Minister remarked, “The whole world is looking at India’s youth with hope. Because you are the growth engines of the country and India is the world’s growth engine.”

PM addresses 42nd Convocation of Anna University, Chennai

July 29th, 09:48 am

PM Modi addressed the 42nd Convocation of Anna University in Chennai. The Prime Minister remarked, “The whole world is looking at India’s youth with hope. Because you are the growth engines of the country and India is the world’s growth engine.”

पंतप्रधानांनी गांधीनगर, गुजरात येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 च्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण

July 04th, 10:57 pm

आजचा हा कार्यक्रम 21 व्या शतकात अधिकाधिक आधुनिक होत असलेल्या भारताची झलक घेऊन आला आहे.संपूर्ण मानवतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतिकारी आहे याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेच्या रूपात संपूर्ण जगासमोर ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्‌घाटन

July 04th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, लोकप्रतिनिधी, स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातले संबंधित यावेळी उपस्थित होते.

डिजिटल इंडिया उपक्रमाच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद

June 15th, 10:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत, सुरू असलेल्या विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडिओ ब्रीजमुळे देशभरातल्या 50 लाख लाभार्थ्यांना एकत्र जोडता आले. यात सामायिक सेवा केंद्रे, एनआयसी केंद्र, राष्ट्रीय ज्ञान केंद्रे, डिपीओ, मोबाईल उत्पादन प्रकल्प आणि ‘मायगोव्ह’ या ॲपवरील स्वयंसेवक या सर्वांशी मोदींनी एकत्र संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून चर्चा करण्याच्या उपक्रमाचा हा सहावा अंक आहे.

डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 15th, 10:56 am

सरकारच्या विविध योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला गेल्या काही दिवसांपासून मिळते आहे. त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे विचार, अनुभव जाणून घेण्याची ही संधी म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो आणि मला नेहमीच थेट संवाद साधायला आवडतं. फाईल्सच्या पलीकडेही “लाईफ’ आहे आणि लोकांच्या “लाईफ’मध्ये जे परिवर्तन आले आहे, त्याचे अनुभव थेट त्याच्या तोंडून ऐकताना मनाला एक वेगळं समाधान मिळतं. काम करण्याची एक नवी ऊर्जा मला तुमच्याशी होणाऱ्या संवादातून मिळते. आज मला डिजिटल इंडियाच्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana is a way to help the poor realise their dreams: PM Modi in Chhattisgarh

February 21st, 10:51 am



PM in Naya Raipur

February 21st, 10:50 am