देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

July 29th, 05:17 pm

विद्यमान शैक्षणिक वर्षात, वैद्यकीय तसेच दंतवैद्यक शाखेतील पदवी आणि पदवीपश्चात अभ्यासक्रमांतील अखिल भारतीय कोटा योजनेच्या प्रवेशप्रक्रियेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात केंद्र सरकारने घेतला अत्यंत महत्वाचा निर्णय

July 29th, 03:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. यानुसार, देशात सर्व वैद्यकीय/दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी(एमबीबीएस/एमडी/एमएस/पदविका/बीडीएस/एमडीएस) मध्ये अखिल भारतीय कोटा(AIQ) योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीयांना 27 % आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10 % आरक्षण दिले जाणार आहे. चालू म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2021-22 पासूनच हा निर्णय लागू होणार आहे.