मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग

September 24th, 11:30 am

‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.

व्लादिवोस्तोक येथील 7 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या सत्रात पंतप्रधान मोदींचे अभिभाषण

September 07th, 02:14 pm

पूर्व आर्थिक मंचाच्या 2022 च्या अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. आर्क्टिक प्रदेशात रशियासोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ऊर्जा क्षेत्रातही सहकार्याला मोठा वाव आहे. युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीपासूनच भारताने मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याच्या गरजेवर भर दिला असल्याचे ते म्हणाले.

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 03rd, 10:33 am

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना मला आनंद होत आहे आणि या सन्मानासाठी मी अध्यक्ष पुतीन यांचे आभार मानतो.

पंतप्रधानांचे व्लादिवोस्तोक येथे आयोजित 6व्या पूर्व आर्थिक मंच 2021 शिखर परिषदेत आभासी माध्यमातून केलेले भाषण

September 03rd, 10:32 am

व्लादिवोस्तोक येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित 6 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या (ईईएफ) शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यापूर्वी पंतप्रधान 2019 मध्ये 5 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते आणि या परिषदेत सहभागी होणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होते.

पूर्व आर्थिक मंचाच्या समारोप सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 05th, 01:33 pm

व्लादिव्होस्टोकच्या शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधताना एक सुखद अनुभव येत आहे. प्रातःकाळी सूर्यकिरणे सर्वात प्रथम इथंच पडतात आणि मग संपूर्ण दुनियेला प्रकाशमान तसंच ऊर्जावान करतात. आज आपण केलेलं हे मंथन केवळ अतिपूर्वेकडील भागाच्याच नाही तर अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी होत असलेल्या प्रयत्नांना नवीन ऊर्जा आणि नवी गती देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली यासाठी आमचे मित्र राष्ट्रपती पुतीन यांचा मी आभारी आहे.

India - Russia Joint Statement during visit of Prime Minister to Vladivostok

September 04th, 02:45 pm



रशियन न्यूज एजन्सी टीएएसएसला पंतप्रधान मोदींनी दिलेली मुलाखत

September 04th, 10:30 am

टासला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की रशियाचे सुदूर पूर्व व्लादिवोस्तोक येथील ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अनुषंगाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवीन वेग मिळेल. “मला खात्री आहे की ही भेट आमच्या देशांमधील संबंधांना नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा देईल,” असे पंतप्रधान मोदी या मुलाखतीत म्हणाले.

पंतप्रधानांचे व्लादिव्होस्टोक, रशिया येथे आगमन

September 04th, 05:15 am

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठी रशियाच्या व्लाडिव्होस्टोक येथे पंतप्रधानांचे आगमन झाले. ते त्यांच्याबरोबर 20 वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील.

Departure Statement by Prime Minister prior to his visit to Vladivostok, Russia for Eastern Economic Forum

September 03rd, 11:35 am

I will be visiting Vlapostok, Russia on 4-5 September, 2019. My visit to Far East Region of Russia, the first by an Indian Prime Minister, underlines the desire on the both sides to persify and further strengthen the bonds of our robust bilateral relations.