टीव्ही 9 कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 26th, 08:55 pm

मी अनेकदा भारताच्या विविधतेबद्दल बोलत असतो. टीव्ही नाईनच्या न्यूजरूममध्ये आणि तुमच्या वार्ताहरांच्या चमूमध्ये ही विविधता स्पष्टपणे दिसून येते. टीव्ही नाईनचे अनेक भारतीय भाषांमध्ये माध्यम व्यासपीठ उपलब्ध आहेत. तुम्ही भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचे प्रतिनिधीही आहात. विविध राज्यांतील, विविध भाषांतील टीव्ही नाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांचे आणि तुमच्या तांत्रिक टीमचे मी अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेला केले संबोधित

February 26th, 07:50 pm

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की टीव्ही 9 ची रिपोर्टिंग टीम भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या बहुभाषिक वृत्त वाहिन्यांनी टीव्ही 9 ला भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा प्रतिनिधी बनवले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

वाराणसी, मधील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 18th, 02:16 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण

December 18th, 02:15 pm

या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.

लखनौमध्ये यूपी गुंतवणूकदार शिखरपरिषदेच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 03rd, 10:35 am

उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ जी, लखनौचे खासदार आणि भारत सरकारमधील आमचे वरिष्‍ठ सहकारी श्रीयुत राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारीवर्ग, यूपीचे उप-मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्रीगण, विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती महोदय, येथे उपस्थित उद्योग जगतातील सर्व सहकारी, अन्य मान्यवर, स्त्री-पुरुषहो!

PM attends the Ground Breaking Ceremony @3.0 of the UP Investors Summit at Lucknow

June 03rd, 10:33 am

PM Modi attended Ground Breaking Ceremony @3.0 of UP Investors Summit at Lucknow. “Only our democratic India has the power to meet the parameters of a trustworthy partner that the world is looking for today. Today the world is looking at India's potential as well as appreciating India's performance”, he said.

महान योद्धे आणि नेत्यांना योग्य तो सन्मान आणि आदर न देणाऱ्या इतिहासातल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

February 16th, 02:45 pm

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करताना, देशासाठी बहुमोल योगदान दिलेल्या थोर नेत्यांचे स्मरण अतिशय महत्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, इतिहासाच्या पुस्तकात योग्य ते महत्व दिले गेले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या टप्यावर या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते.

उत्तर प्रदेशातील बहराईच येथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 16th, 11:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

February 16th, 11:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Freight corridors will strengthen Aatmanirbhar Bharat Abhiyan: PM Modi

December 29th, 11:01 am

Prime Minister Narendra Modi inaugurated the New Bhaupur-New Khurja section of the Eastern Dedicated Freight Corridor in Uttar Pradesh. PM Modi said that the Dedicated Freight Corridor will enhance ease of doing business, cut down logistics cost as well as be immensely beneficial for transportation of perishable goods at a faster pace.

पंतप्रधानांनी ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर- न्यू खुर्जा टप्प्याचे आणि परिचालन नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले.

December 29th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर – न्यू खुर्जा टप्प्याचे आणि परिचालन नियंत्रण केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन केले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते .

PM to inaugurate the New Bhaupur- New Khurja section and the Operation Control Centre of Eastern Dedicated Freight Corridor on 29 December

December 27th, 03:52 pm

Prime Minister Narendra Modi will inaugurate the ‘New Bhaupur- New Khurja section’ of Eastern Dedicated Freight Corridor on 29th December, 2020 at 11 AM. During the event, Prime Minister will also inaugurate EDFC’s Operation Control Centre (OCC) at Prayagraj.