Our government's intentions, policies and decisions are empowering rural India with new energy: PM

January 04th, 11:15 am

PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.

PM Modi inaugurates the Grameen Bharat Mahotsav 2025

January 04th, 10:59 am

PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.

Kashi is now becoming a big health center & healthcare hub of Purvanchal: PM in Varanasi

October 20th, 02:21 pm

Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.

Prime Minister Shri Narendra Modi inaugurates RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh

October 20th, 02:15 pm

Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.

जी20 आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

August 18th, 02:15 pm

गांधीजींनी आरोग्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा मानला की त्यांनी या विषयावर 'की टू हेल्थ' (आरोग्याची गुरुकिल्ली) या नावाचे पुस्तक लिहिले. निरोगी असणे म्हणजे मन आणि शरीर सुसूत्र आणि समतोल स्थितीत असणे म्हणजेच आरोग्य हा जीवनाचा मोठा पाया आहे, असे त्यांनी सांगितले होते. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे:

जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 18th, 01:52 pm

या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी, भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील 2.1 दशलक्ष डॉक्टर, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी, 1.6 दशलक्ष औषध उत्पादक आणि विक्रेते तसेच इतर लाखो लोकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 11th, 11:00 am

आज 11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवसांपैकी एक आहे. आज भारतातील शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अशी कामगिरी केली होती, ज्यामुळे भारतमातेच्या प्रत्येक अपत्याची मान अभिमानाने उंचावली होती. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस माझ्यासाठीही अविस्मरणीय आहे. पोखरण अणुचाचणीद्वारे भारताने आपली वैज्ञानिक क्षमता तर सिद्ध केलीच, पण जागतिक स्तरावर भारताला एक नवी उंचीही मिळवून दिली. अटलजींच्याच शब्दात सांगायचे तर, आम्ही आमच्या अथक प्रवासात कधी विश्रांती घेतली नाही. कोणत्याही आव्हानासमोर शरणागती पत्करली नाही. मी सर्व देशवासियांना आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त 11 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

May 11th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. पंचविसाव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त 11 ते 14 मे या कालावधीत आयोजित उत्सवाची सुरुवात देखील या कार्यक्रमात करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. देशातील वैज्ञानिक संस्थांना बळकट करून आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी हे अनुरूप आहे.

गुवाहाटी येथील एम्स रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 14th, 12:45 pm

आसामचे राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी आणि डॉ. भारती पवार जी, आसाम सरकारचे मंत्री केशब महंता जी, वैद्यकीय जगतातील सर्व मान्यवर व्यक्ती, विविध ठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडलेले सर्व मान्यवर आणि आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधानांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

April 14th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी आसाम ऍडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोवेशन इन्स्टीट्युटची(AAHII) देखील पायाभरणी केली आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ या मोहिमेचा शुभारंभ केला.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 18th, 11:17 pm

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की हा क्षण भारताचा आहे. मात्र जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.

इंडिया टूडे कॉनक्लेव्हला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 18th, 08:00 pm

नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

तंत्रज्ञान जीवनावर सकारात्मक परिणाम करण्याबरोबरच नागरिकांचे सक्षमीकरणही करत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

March 06th, 09:07 pm

तंत्रज्ञानामुळे जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे आणि त्याचबरोबर नागरिकांचे सक्षमीकरणही होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभा खासदार नबाम रेबिया यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. डिजिटल इंडिया मोहीम सुरू होण्यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील शेरगावात फक्त 1 मोबाईल सेवा प्रदाता होता आणि आता येथे 3 मोबाईल सेवा पुरवठादार आहेत अशी माहिती रेबिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिली.

‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 06th, 10:30 am

जेव्हा आपण आरोग्याविषयी चर्चा करतो, तेव्हा या विषयाकडे, कोविडपूर्व काळ आणि कोविडोत्तर असं विभागून बघायला हवं. कोविडने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि शिकवलं देखील की जेव्हा इतकं मोठं संकट येतं तेव्हा समृद्ध देशाच्या विकसित व्यवस्था सुद्धा उध्वस्त होतात. जग आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त लक्ष आरोग्य सेवेकडे देऊ लागलं आहे, मात्र भारताचा दृष्टीकोन फक्त आरोग्य सेवेपुरताच मर्यादित नाही, तर आपण एक पाऊल पुढे जाऊन निरामयतेसाठी देखील काम करत आहोत. म्हणून आपण जगासमोर एक विचार ठेवला आहे - एक पृथ्वी - एक आरोग्य. म्हणजे जीव सृष्टीसाठी, मग ते मनुष्य असो की प्राणी असो, वृक्षं असोत, सर्वांसाठी एक सर्वंकष आरोग्य सेवेचा विचार आहे. कोविड जागतिक महामारीने आपल्याला हे देखील शिकवलं आहे, की पुरवठा साखळी, किती महत्वपूर्ण विषय बनला आहे. जेव्हा जागतिक महामारी टिपेला होती, तेव्हा काही देशांसाठी औषधं, लसी, वैद्यकीय उपकरणं, अशा जीवन रक्षक गोष्टी दुर्दैवानं हत्यार बनल्या होत्या. गेल्या वर्षांच्या अर्थसंकल्पात भारतानं या सगळ्या विषयांवर खूप लक्ष दिलं आहे. आम्ही सातत्यानं परदेशांवर असलेली अवलंबिता कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत सर्वच भागधारकांची भूमिका फार मोठी आहे.

आरोग्य आणि वैद्यकीय संशोधनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 06th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील हा नववा भाग आहे.

‘मन की बात’ हे लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे अद्भुत माध्यम झाले आहे: पंतप्रधान मोदी

February 26th, 11:00 am

मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.