प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 10th, 12:01 pm
देशासाठी, बिहारसाठी, गावामध्ये आपल्या सर्वांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी मासे उत्पादन, दुग्धालय, पशुपालन आणि कृषी क्षेत्राविषयी अभ्यास तसेच संशोधन यांच्याशी संबंधित शेकडो कोटींच्या योजनेचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्यात येत आहे. या योजनांसाठी बिहारच्या बंधू-भगिनींचे खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी बिहारमध्ये पीएम मत्स्य संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला
September 10th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मत्स संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि मत्स्यपालन उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीमधील अभ्यास आणि संशोधनाशी निगडित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार
September 09th, 01:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प शेतक ऱ्यांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल आहे. तसेच बिहारमध्ये मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रातील इतरही अनेक उपक्रम पंतप्रधानांच्या हस्ते सुरु केले जाणार आहेत.