ONDC has contributed to empowering small businesses and revolutionising e-commerce: PM Modi

January 02nd, 10:23 am

The Prime Minister Shri Narendra Modi today highlighted ONDC’s contribution in empowering small businesses and revolutionising e-commerce and remarked that it will play a vital role in furthering growth and prosperity.

नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

January 27th, 05:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...

पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित

January 27th, 04:30 pm

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान (पीएम विकास) या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 11th, 10:36 am

गेल्या अनेक दिवसांपासून अर्थसंकल्पानंतर वेबिनार घेण्याचा एक पायंडा आम्ही पाडला आहे. गेल्या तीन वर्षात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या अर्थसंकल्पाविषयी विविध हितसंबंधीयांशी चर्चा करण्याची एक परंपरा आम्ही सुरू केली आहे, आणि जो अर्थसंकल्प आपण मांडला आहे, तो आपण लवकरात लवकर संपूर्ण लक्ष देऊन कसा लागू करता येईल, याबद्दल भागधारक काही सूचना किंवा सल्ले देऊ शकतात का, त्यांच्या सूचनांवर सरकार काय अंमलबजावणी करू शकते, अशा सर्व गोष्टींवर अत्यंत भरीव मंथन या वेबिनारमध्ये होते. मला अतिशय आनंद आहे की सर्व संघटना, व्यापार आणि उद्योग यांच्याशी थेट संबंधित असलेले घटक, मग ते शेतकरी असोत, महिला असोत, युवा असोत किंवा आदिवासी असोत, आपले दलित बंधूभगिनी असोत, हे सगळे अर्थसंकल्पाचे भागीदार आणि हजारोंच्या संख्येने इथे संपूर्ण दिवस बसलेले लोक यांच्या विचारमंथनातून अतिशय उत्तम सूचना/सल्ले आपल्याला मिळतात. सरकारसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या सूचना यातून मिळाल्या आहेत; आणि माझ्यासाठी आणखी एक आनंदाची बाब ही की, या वेबिनारमध्ये या अर्थसंकल्पात अमुक असायला हवे, अमुक असायला नको होते, असे हवे होते अशा चर्चा करण्याऐवजी सर्व भागधारक हा अर्थसंकल्प सर्वांसाठी उपयुक्त कसा ठरेल, त्याचे काय मार्ग असू शकतात, याविषयी मुद्देसूद चर्चा करतात.

पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

March 11th, 10:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ या विषयावर अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला मार्गदर्शन केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मते आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्प पश्चात वेबिनारच्या मालिकेतील हे हा शेवटचे आणि अंतिम वेबिनार होते.

केंद्रीय मंत्रिमंडळाने रुपे डेबिट कार्ड आणि कमी मूल्याच्या BHIM-UPI व्यवहारांना (P2M) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनलाभ योजनेला दिली मंजुरी

January 11th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी रुपे डेबिट कार्ड आणि कमी मूल्याच्या BHIM-UPI व्यवहारांना (व्यक्ती-ते-व्यापारी) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनलाभ योजना मंजूर केली आहे.

Flexible workplaces, a work-from-home ecosystem & flexible work hours are need of the future: PM

August 25th, 04:31 pm

PM Modi addressed the National Conference of Labour Ministers of all States and Union Territories via video conferencing. He reiterated the various efforts by the Government like Pradhan Mantri Shram-Yogi Maandhan Yojana, Pradhan Mantri Suraksha Bima Yojana, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana that have given a security cover to the workers.

पंतप्रधानांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

August 25th, 04:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव व रामेश्वर तेली आणि राज्यांचे कामगार मंत्री यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी गांधीनगर, गुजरात येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 च्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण

July 04th, 10:57 pm

आजचा हा कार्यक्रम 21 व्या शतकात अधिकाधिक आधुनिक होत असलेल्या भारताची झलक घेऊन आला आहे.संपूर्ण मानवतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतिकारी आहे याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेच्या रूपात संपूर्ण जगासमोर ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्‌घाटन

July 04th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, लोकप्रतिनिधी, स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातले संबंधित यावेळी उपस्थित होते.

Start-ups are reflecting the spirit of New India: PM Modi during Mann Ki Baat

May 29th, 11:30 am

During Mann Ki Baat, Prime Minister Narendra Modi expressed his joy over India creating 100 unicorns. PM Modi said that start-ups were reflecting the spirit of New India and he applauded the mentors who had dedicated themselves to promote start-ups. PM Modi also shared thoughts on Yoga Day, his recent Japan visit and cleanliness.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील हितसंबंधियांशी संवाद

August 06th, 06:31 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, जगभरात सेवा देत असलेले सर्व राजदूत, उच्चायुक्त, केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व अधिकारी तसेच वेगवेगळी निर्यात मंडळे, वाणिज्य आणि उद्योग संघटनेतील सर्व नेते, महोदय आणि महोदया!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशातील भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

August 06th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परदेशातील भारतीय दूतावासाच्या प्रमुखांशी तसेच व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री देखील या संवादसत्रात सहभागी झाले होते.

Increase social distancing, reduce emotional distancing: PM Modi during Mann Ki Baat

March 29th, 10:36 am

During ‘Mann Ki Baat’, PM Modi spoke at length about the Coronavirus pandemic. PM Modi emphasized on ‘social distancing’ to fight the COVID-19 menace and applauded the doctors and other health care workers for their untiring efforts. He hailed them as the ‘front-line soldiers.’ The Prime Minister said the ongoing lockdown was necessary to break the chain of virus transmission and ensure everyone’s safety.

This year’s Budget has given utmost thrust to manufacturing and Ease of Doing Business: PM

February 16th, 02:46 pm

PM Modi participated in 'Kashi Ek Roop Anek' organized at the Deendayal Upadhyaya Trade Facilitation Centre in Varanasi. Addressing the event, PM Modi said that government will keep taking decisions to achieve the goal of 5 trillion dollar economy.

वाराणसी येथे आयोजित केलेल्या ‘काशी एक रुप अनेक’ कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

February 16th, 02:45 pm

भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स करण्याचे उदिृष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार निर्णय घेण्याची प्रक्रिया जारी ठेवेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. पारंपारिक हस्तकला कारागिरांना, शिल्पकारांना सुविधा पुरवून तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही सुविधा पुरवून बळकट करण्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले.

Prime Minister to participate in East Asia and RCEP Summit in Bangkok

November 04th, 11:54 am

Prime Minister Narendra Modi will participate in the East Asia and RCEP summits in Bangkok today. Besides he will also hold meetings with Japan Prime Minister Shinzō Abe, Vietnam PM Nguyen Xuan Phuc and Australian PM Scott Morrison in Bangkok, before he returns to Delhi tonight.

एमएसएमई क्षेत्राची व्याप्ती वाढवणारे उपक्रम आणिऐतिहासिक पाठबळ देणाऱ्या सरकारच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेलं भाषण

November 02nd, 05:51 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अरुण जेटलीजी, गिरीराज सिंह जी, शिवप्रताप शुक्ल जी, पोन राधाकृष्णन जी, इतर सहकारी, बँकिग क्षेत्रातले, वित्तीय संस्था, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले उपस्थित सर्व मान्यवर आणि देशभरात हा कार्यक्रम बघत असलेले, माझे लघुउद्योजक तसेच, बंधू आणि भगिनीनो,

पंतप्रधानांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रासाठी 12 निर्णयांचा शुभारंभ

November 02nd, 05:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक एमएसएमई कर्ज मंजुरीच्या पोर्टलचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी एमएसएमई क्षेत्र विकासासाठी 12 निर्णय घोषित करून शुभारंभ केला. ज्यामुळे भारतभर या क्षेत्राची वृद्धी, विस्तार आणि सुविधा देण्याला मदत मिळणार आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

September 20th, 04:48 pm

संपूर्ण देश गणपती उत्सवात मग्न आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी भगवान गणेशाचे स्मरण करूनच सुरवात करतात. भव्य-दिव्य भारताचे मोठे प्रतिक, नव भारतासाठी एका महत्वाच्या केंद्राचा आज श्री गणेशा करण्याची ही उपयुक्त संधी आहे.