रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकतेवर आधारित बोनस द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 03rd, 09:53 pm

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 11,72,240 रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस (पीएलबी) म्हणून, कामाच्या 78 दिवसांकरता एकूण 2028.57 कोटी रुपयांना मंजुरी दिली.

Today, Congress party is roaming around like the ‘Sultan’ of a ‘Tukde-Tukde’ gang: PM Modi in Mysuru

April 14th, 10:07 pm

Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Mysuru, Karnataka, seeking blessings from Tai Chamundeshwari. Expressing reverence, he bowed to the feet of Tai Chamundeshwari, Tai Bhuvaneshwari, and Tai Kaveri, symbolizing the essence of power inherent in the land of Mysuru and Karnataka. Acknowledging the significant presence of the people, especially the mothers and sisters of Karnataka, PM Modi emphasized the state's resounding call for the return of the Modi government.

PM Modi addresses a public meeting in Mysuru, Karnataka

April 14th, 05:00 pm

Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Mysuru, Karnataka, seeking blessings from Tai Chamundeshwari. Expressing reverence, he bowed to the feet of Tai Chamundeshwari, Tai Bhuvaneshwari, and Tai Kaveri, symbolizing the essence of power inherent in the land of Mysuru and Karnataka. Acknowledging the significant presence of the people, especially the mothers and sisters of Karnataka, PM Modi emphasized the state's resounding call for the return of the Modi government.

द्वारका, दिल्ली येथे विजयादशमी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 24th, 06:32 pm

मी सर्व भारतीयांना शक्तीपूजनाच्या नवरात्रीच्या आणि विजय पर्व असलेल्या विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा विजय , अहंकारावर नम्रतेचा विजय आणि क्रोधावर संयमाच्या विजयाचा सण आहे. अत्याचारी रावणावर प्रभू श्रीरामाच्या विजयाचा हा सण आहे. या भावनेने आपण दरवर्षी रावण दहन करतो. पण हे इतके पुरेसे नाही. हा सण आपल्यासाठी संकल्पांचाही सण आहे, आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचाही सण आहे.

दिल्लीत द्वारका इथे आयोजित विजयादशमी सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

October 24th, 06:31 pm

या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की विजयादशमी हा सण अन्यायावर न्यायाच्या, अहंकारावर मानवतेच्या, क्रोधावर संयमाने मिळवलेल्या विजयाचा सण आहे. हा दिवस आपण घेतलेल्या शपथा, आपण केलेले संकल्प यांना नवीन झळाळी देण्याचा सुद्धा आहे असे ते म्हणाले.

मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग

September 24th, 11:30 am

‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 07th, 04:16 pm

काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

August 07th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.

कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान झाले सहभागी

October 05th, 04:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील धालपूर मैदानावर आयोजित कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी झाले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

September 28th, 04:06 pm

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण

October 05th, 10:31 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्‌घाटन

October 05th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्‌घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा

October 25th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

October 25th, 11:00 am

मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.

दिल्लीतल्या द्वारका इथल्या डीडीए मैदानावर दसरा साजरा करताना पंतप्रधानांचे संबोधन

October 08th, 05:31 pm

भारत उत्सवांची भूमी आहे. वर्षाच्या 365 दिवसांपैकी कदाचित एखादाच दिवस असा असेल ज्या दिवशी हिंदुस्तानच्या कोणत्याच भागात कोणताही उत्सव साजरा झाला नसेल.

द्वारका येथील डीडीए ग्राउंड वरील दसरा सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती

October 08th, 05:30 pm

द्वारका येथील डीडीए ग्राउंड येथील दसरा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

October 08th, 10:32 am

विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (29 सप्टेंबर 2019)

September 29th, 11:00 am

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार. मित्रहो, आज ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये मी देशातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करणार आहे. मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आपणा सर्व भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची, आपुलकीची भावना आहे. त्यांच्याविषयी आदर वाटत नसेल, असा भारतीय नागरीक शोधूनही सापडणार नाही. त्या वयाने आपल्या सर्वांपेक्षा फार मोठ्या आहेत आणि देशाच्या विविध टप्प्यांच्या, विविध कालखंडांच्या त्या साक्षीदार आहेत. आपण त्यांना ‘दिदी’ म्हणतो, लता दिदी. यावर्षी, 28 सप्टेंबर रोजी त्या 90 वर्षांच्या झाल्या.

15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग

October 19th, 06:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील 15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात सहभागी झाले .

Social Media Corner 12th October 2016

October 12th, 07:35 pm

Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!