दुबईचे शासक, संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक
February 14th, 03:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली येथे भारत मार्टची केली पायाभरणी
February 14th, 03:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली फ्री ट्रेड झोन येथे डीपी वर्ल्डद्वारे बांधल्या जात असलेल्या भारत मार्टची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी 2024 रोजी पायाभरणी केली.दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषद 2024 दरम्यान पंतप्रधानांनी घेतली मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
February 14th, 02:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुबई येथे जागतिक सरकारांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोएलिना यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.जागतिक सरकार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 02:30 pm
जागतिक सरकार शिखर परिषदेत मुख्य भाषण देणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.आणि हे भाग्य मला दुसऱ्यांदा मिळत आहे. या निमंत्रणासाठी आणि शानदार स्वागतासाठी मी महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद जी यांचा खूप खूप आभारी आहे.मी माझे बंधू महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो. अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली. ते केवळ दूरदृष्टी असलेले नेतेच नाहीत तर संकल्प आणि वचनबद्धता दर्शवणारे देखील नेते आहेत.जागतिक सरकार शिखर परिषद 2024 मध्ये पंतप्रधान सहभागी
February 14th, 02:09 pm
संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. भविष्यातील सरकारांना आकार देणे या परिषदेच्या संकल्पनेवर पंतप्रधानांनी विशेष मुख्य भाषण केले . 2018 मधील जागतिक सरकार शिखर परिषदेला देखील पंतप्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी या शिखर परिषदेत 10 राष्ट्राध्यक्ष आणि 10 पंतप्रधानांसह 20 जागतिक नेते सहभागी झाले. या जागतिक परिषदेला120 हून अधिक देशांची सरकारे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट
December 01st, 09:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई मधील कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2023 रोजी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी घेतली स्वीडनच्या पंतप्रधानांची भेट
December 01st, 08:32 pm
उल्फ क्रिस्टरसन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथील कॉप-28 येथे द्विपक्षीय बैठक घेतली.भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.कॉप-28 परिषदेत ‘ट्रान्सफॉर्मिंग क्लायमेट फायनान्स’ या विषयावरील सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 01st, 08:06 pm
भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदांतर्गत शाश्वत विकास आणि हवामान बदल या दोन्ही विषयांना मोठे प्राधान्य दिले आहे.स्विस महासंघाच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची बैठक
December 01st, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी दुबईत कॉप-28 परिषदेच्या निमित्ताने स्विस महासंघाचे अध्यक्ष अलेन बर्सेट यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट
December 01st, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी यूएई मध्ये कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली.LEAD-IT is a robust initiative for Earth's secured future: PM Modi
December 01st, 07:29 pm
Addressing the Leadership Group for Industry Transition (LEAD-IT) at COP 28, PM Modi stated that Leadership Group for Industry Transition is a robust initiative for Earth's secured future. He added that LEAD-IT initiative emboldens global low-carbon technologies and speeds up innovation. He said that the initiative will also enable the creation of energy transition roadmaps and knowledge sharing among countries.The holistic fusion of carbon credits with social responsibility will serve as the new philosophy of Green Credit: PM Modi
December 01st, 07:22 pm
Addressing a high-level event on 'Green Credit Programme', PM Modi said The holistic fusion of carbon credits with social responsibility will serve as the new philosophy of Green Credit. He added that in the health card of planet Earth there is an addition of some positive points and this will be reinforced through the Green Credit initiative.पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांशी भेट
December 01st, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस (यूएनएसजी) महामहीम अँटोनियो गुटेरेस यांची 1 डिसेंबर 2023 रोजी, दुबई येथे कॉप-28 शिखर परिषदेदरम्यान भेट घेतली.कॉप 28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
December 01st, 06:44 pm
दोन्ही नेत्यांनी सध्या चालू असलेल्या इस्रायल - हमास संघर्षावर विचार विनिमय केला. पंतप्रधानांनी 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि ओलीसांच्या सुटकेचे स्वागत केले.कॉप-28 मधील सदस्य देशांच्या एचओएस/एचओजीच्या उच्चस्तरीय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले विशेष भाषण
December 01st, 03:55 pm
आपल्यापैकी प्रत्येक देश स्वतःसाठी जी हवामानविषयक उद्दिष्ट्ये निश्चित करत आहे, जी कटिबद्धता दर्शवत आहे ती पूर्ण करुनच दाखवली जातील असा निश्चय आपल्याला करावा लागेल.PM Modi arrives in Dubai to attend the COP 28 Summit
November 30th, 11:30 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Dubai to attend the COP 28 Summit. He will join special events including on climate finance, Green Credit initiative and LeadIT.एक्स्पो 2020 दुबई इथे भारतीय दालनातल्या उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
October 01st, 08:55 pm
एक्स्पो 2020 दुबई इथल्या भारतीय दालनात स्वागत. हे ऐतिहासिक प्रदर्शन आहे. मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया क्षेत्रात होणारे हे पहिले प्रदर्शन आहे. मोठ्या दालनापैकी एका दालनासह भारत यामध्ये सहभागी होत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबई समवेत असलेले प्रदीर्घ आणि ऐतिहासिक संबंध हे प्रदर्शन अधिक दीर्घ करेल असा मला विश्वास आहे. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक महामहीम शेख खलीफा बिन झायेद बिन अल नाह्यान यांना भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊन मी सुरुवात करतो.दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांनी दिलेला संदेश
October 01st, 08:54 pm
दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पव्हेलियनला दिलेल्या संदेशात या प्रदर्शनाला ऐतिहासिक असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियाई प्रदेशात प्रथमच हे प्रदर्शन भरत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबईशी असलेले आमचे दृढ आणि ऐतिहासिक नातेसंबंध अधिक चांगल्या पद्धतीने जपण्यासाठी हे प्रदर्शन दीर्घकाळ मदत करेल.” पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे राज्यकर्ते महामहीम शेख खलिफा बिन झायेद बिन अल् नह्यान तसेच संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन रशिद अल् मक्तोम यांचे अभिनंदन केले. “आपल्या धोरणात्मक भागीदारीबाबत प्रगती करण्यात दोन्ही देशांना जे यश मिळाले आहे त्यासाठी राजपुत्र महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल् नह्यान यांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे, दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धी साधण्यासाठी आपण असेच एकत्रितपणे काम करत राहू अशी अशा मी व्यक्त करतो,” असे गौरवोद्गार काढत पंतप्रधानांनी राजपुत्र महोदयांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
September 03rd, 10:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नहियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. कोविड -19 महामारी दरम्यान भारतीय समुदायाला संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या मदतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 1 ऑक्टोबर 2021 पासून दुबईत आयोजित एक्स्पो -2020 साठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.