18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 एफएम ट्रान्समीटर्सच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 28th, 10:50 am

आजच्या या कार्यक्रमात पद्म सन्मान प्राप्त करणारी अनेक व्यक्तिमत्वे देखील आपल्या सोबत सहभागी झाली आहेत. मी त्यांचे देखील आदरपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज ऑल इंडिया रेडियो च्या एफएम सेवेचा हा विस्तार, देशव्यापी एफएम बनण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. आकाशवाणीच्या 91 एफएम ट्रान्समीटर्सची ही सुरुवात देशातील 85 जिल्ह्यांमधील 2 कोटी लोकांसाठी एखाद्या भेटवस्तू प्रमाणे आहे. एका प्रकारे या आयोजनात भारताची विविधता आणि वेगवेगळया रंगांची झलक देखील आहे. ज्या जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट केले जात आहे त्यामध्ये आकांक्षी जिल्हे, आकांक्षी तालुक्यांना देखील या सेवांचा लाभ मिळत आहे. मी या कामगिरीसाठी आकाशवाणीचे अभिनंदन करत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. आपल्या ईशान्येकडील बंधुभगिनींना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, युवा मित्रांना होणार आहे. यासाठी त्यांचे मी विशेषत्वाने अभिनंदन करतो.

देशात एफएम संपर्क व्यवस्थेच्या विस्तारासाठी 91 नवीन 100 व्हॅट एफएम ट्रान्समीटर्सचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

April 28th, 10:30 am

पंतप्रधानांनी उपस्थितांना यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित पद्म पुरस्कार विजेत्यांचेही त्यांनी स्वागत केले. आकाशवाणीने केलेले हे एफएम विस्तारीकरण त्याच्या देशव्यापी एफएम होण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आकाशवाणीने सुरु केलेले हे नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स 85 जिल्हे आणि देशातील 2 कोटी लोकांसाठी भेटवस्तू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एक प्रकारे, हे भारतातील विविधता आणि त्यांच्या नाना रंगांची झलक देते, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स अंतर्गत समाविष्ट असलेले जिल्हे हे आकांक्षीत जिल्हे आणि विभाग आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आकाशवाणीचे अभिनंदनही केले. याचा मोठा लाभ होणार असलेल्या ईशान्य भारतातील नागरिकांचेही त्यांनी अभिनंदन केले.

दक्षिण आशियाई उपग्रह- काही ठळक वैशिष्ट्ये

May 05th, 07:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, दक्षिण आशिया क्षेत्रातल्या शेजारी देशांना दक्षिण आशिया उपग्रहाची अनोखी भेट देऊन अंतराळ विषयक मुत्सद्देगिरीला नवीन उंचीवर नेलं आहे. शेजारी देशांना वापरण्यासाठी संपर्क उपग्रहाची विनामूल्य भेट देण्याची घटना यापूर्वी कधी घडली नाही. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हा उपग्रह महत्वपूर्ण माहिती देईल.