The bond between India & Guyana is of soil, of sweat, of hard work: PM Modi
November 21st, 08:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.PM Modi addresses the Parliament of Guyana
November 21st, 07:50 pm
PM Modi addressed the National Assembly of Guyana, highlighting the historical ties and shared democratic ethos between the two nations. He thanked Guyana for its highest honor and emphasized India's 'Humanity First' approach, amplifying the Global South's voice and fostering global friendships.जमैकाच्या पंतप्रधानांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
October 01st, 12:00 pm
पंतप्रधान होलनेस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. पंतप्रधान होलनेस प्रथमच भारताच्या द्विपक्षीय दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळेच आम्ही या भेटीला विशेष महत्त्व देतो.पंतप्रधान होलनेस हे दीर्घकाळापासूनचे भारताचे मित्र आहेत. त्यांना भेटण्याची संधी मला अनेकवेळा मिळाली आहे. आणि प्रत्येक वेळी, त्यांच्या विचारांमध्ये मला भारतासोबतचे संबंध दृढ करण्याप्रति वचनबद्धता जाणवली आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या या भेटीमुळे आमच्या द्विपक्षीय संबंधांना नवीन ऊर्जा मिळेल तसेच संपूर्ण कॅरिबियन प्रदेशासोबत आमचे संबंध वृद्धिंगत करेल.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
October 10th, 06:25 pm
140 कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.याच ठिकाणी,याच स्टेडीयममध्ये 1951 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या हा सुखद योगायोग आहे. आज आपणा सर्वांनी जी कामगिरी केली आहे,जे यश साध्य केले आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवी वातावरण आहे. पदकांचा 100 चा टप्पा ओलांडण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत.आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणा सर्व खेळाडूंच्या कामगिरीने अवघ्या देशामध्ये अभिमानाची भावना दाटून आली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांनी केले संबोधित
October 10th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके जिंकली ज्यामुळे खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.जप्त केलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करण्याच्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
July 17th, 10:21 pm
जप्त करण्यात आलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करत भारताने अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यात गाठलेल्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.समाजातून अंमली पदार्थांचे संकट नष्ट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 20th, 10:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.तामिळ नववर्ष समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 13th, 08:21 pm
आपल्या सर्वांना तामिळ पुथांडू निमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं प्रेम, माझ्या तमिळ बंधू-भगिनींच्या स्नेहामुळेच आज मला आपल्या बरोबर तामिळ पुथांडू साजरा करण्याची संधी मिळाली आहे. पुथांडू म्हणजे पुरातन काळातील नवोन्मेषाचा सण! तामिळ संस्कृती एवढी प्राचीन आहे, आणि दर वर्षी पुथांडू मधून नवीन ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करण्याची ही परंपरा खरोखरच अद्भुत आहे! हीच गोष्ट तामिळनाडू आणि तामिळ लोकांचं वेगळेपण आहे. म्हणून मला नेहमीच या परंपरेचं आकर्षण वाटत आलं आहे आणि तिच्याशी मी भावनिक रित्या जोडला गेलो आहे. मी गुजरातमध्ये असताना, ज्या मणीनगर विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार होतो, तिथे मोठ्या संख्येने मूळचे तामिळनाडू इथले नागरिक राहत होते, ते माझे मतदार होते, ते मला आमदारही बनवायचे आणि मुख्यमंत्रीही बनवायचे. त्यांच्या बरोबर व्यतीत केलेले क्षण मला नेहमी आठवतात. माझं हे भाग्य आहे, की मी तामीळनाडूला जेवढं प्रेम दिलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम मला तामिळ जनतेने नेहमीच परत दिलं.पंतप्रधान तमिळ नववर्ष समारंभामध्ये झाले सहभागी
April 13th, 08:20 pm
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी पुत्तांडू साजरे करण्यासाठी आपले तमिळ बंधू आणि भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “पुत्तांडू हा प्राचीन परंपरेतील आधुनिकतेचा उत्सव आहे. तमिळ संस्कृती प्राचीन असली तरीही दरवर्षी नवीन ऊर्जा घेऊन पुढे जात आहे, ही गोष्ट उल्लेखनीय आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तमिळ लोकांच्या आणि संस्कृतीच्या वेगळेपणावर भर देत पंतप्रधानांनी तामिळ संस्कृतीबद्दल त्यांना आकर्षण वाटते तसेच एक भावनिक ओढही असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये आपल्या पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघात तमिळ लोकांची संख्या भरपूर होती आणि त्यांनी आपल्याला प्रचंड प्रेम दिले, याचे स्मरण करून पंतप्रधानांनी तमिळ लोकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.