आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे उद्योग धुरिणांकडून कौतुक
October 15th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (आयटीयू-डब्ल्यूटीएसए) 2024 दरम्यान 8 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन केले. डब्ल्यूटीएसए ही डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ संस्थेच्या मानकीकरण कार्यासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी प्रशासकीय परिषद आहे. भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रथमच आयटीयू-डब्ल्यूटीएसए चे यजमानपद भूषवत आहे. 190 हून अधिक देशांतील दूरसंचार, डिजिटल आणि आयसीटी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3,000 हून अधिक उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांना एकत्र आणणारा हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे.पंतप्रधानांनी घेतली इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन संस्थेच्या सचिव, डोरिन बोग्दन मार्टिन यांची भेट
March 24th, 08:28 am
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन या संस्थेच्या सचिव डोरिन बागदेन मार्टिन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. पृथ्वीच्या भल्यासाठी आणि शाश्वततेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ या विषयावर दोन्ही मान्यवरांची सविस्तर चर्चा झाली.