अरुणाचल प्रदेशामधील विकसित भारत - विकसित (नॉर्थ ईस्ट) ईशान्य प्रदेश कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 09th, 11:09 am

अरुणाचल प्रदेश, मणिपुर, मेघालय, नागालैंड, सिक्किम आणि त्रिपुराचे राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री गण, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यांमधील मंत्रीगण, संसदेतील सहकारी, सर्व उपस्थित आमदार, इतर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि या सर्व राज्यांमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!

अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे पंतप्रधानांनी केले विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमात मार्गदर्शन

March 09th, 10:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमाला संबोधित केले. मोदी यांनी मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात सुमारे 55,600 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. त्यांनी सेला बोगद्याचे लोकार्पण केले आणि सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या उन्नती योजनेचा शुभारंभ केला. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

डोनी पोलो विमानतळामुळे अरुणाचल प्रदेशात पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा पंतप्रधानांकडून व्यक्त

November 30th, 04:30 pm

इटानगरमधील डोनी पोलो विमानतळ सुरु झाल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नयनरम्य दृश्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

अरुणाचल प्रदेश सारख्या महान राज्यासाठी काम करून त्यांना क्षमतेची जाणीव करून देणं हा सन्मान आहे : पंतप्रधान

November 20th, 09:59 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इथं विकास कामांना केलेल्या सुरुवातीनंतर लोकांनी केलेल्या कौतुकाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांनी काल इटानगर इथं डोंयी पोलो विमानतळाचे उद्घाटन आणि 600 मेगावॅट क्षमतेच्या कामेंगऔष्णिक ऊर्जा केंद्राच लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

November 17th, 03:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्‌घाटन करतील.