पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 11:30 am
देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
August 06th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,पंतप्रधानांनी गुवाहाटी ते जलपायगुडी यांना जोडणाऱ्या आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 29th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.सिल्वासा येथे विविध सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य. (दादरा आणि नगर हवेली)
April 17th, 02:37 pm
मंचावर विराजमान दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक श्री. प्रफुल्ल भाई पटेल, येथील खासदार श्री नटू भाई, शेजारचे दमणचे खासदार श्री लालू भाई, दादरा-नगर हवेली आणि जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष श्री. रमण ककुवा जी, सिल्वासाचे नगराध्यक्ष भाई राकेश चौहानजी आणि विशाल संख्येने येथे उपस्थित दादरा, नगर हवेलीच्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, मराठीमध्ये बोलू, हिंदीमध्ये बोलू की गुजरातीमध्ये बोलू, बोला... बरं, एक काम करा. आपला मोबाईल बाहेर काढा आणि त्याची लाईट सुरू करून आजच्या या भव्य कार्यक्रमाचे आपण स्वागत करा.पंतप्रधानांनी दादरा-नगर हवेलीत केला सरकारी प्रकल्पांचा शुभारंभ
April 17th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा तसेच दादरा-नगर हवेलीत अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये सौर प्रणाली, जन औषधी केंद्रे आणि पासपोर्ट सेवा केंद्राचा समोवश होता.