जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर एमपॉक्स परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देखरेख
August 18th, 07:42 pm
पंतप्रधानांनी सूचना केल्यानुसार पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांनी देशात एमपॉक्स या आजारासंदर्भात सज्जतेच्या स्थितीचा आणि संबंधित सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेणाऱ्या एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.'काला आजार' या रोगाच्या घटत्या रुग्ण संख्येबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
January 06th, 05:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काला आजारच्या घटत्या रुग्ण संख्येबाबत आनंद व्यक्त केला आहे. काला आजार रोगावरील त्यांच्या मन की बात कार्यक्रमातील काही उतारे देखील त्यांनी सामायिक केले.जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध वैश्विक केंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 19th, 03:49 pm
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ जी, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक- डॉक्टर टेड्रोस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल, डॉक्टर मनसुख मांडवीय, मुंजपारा महेंद्रभाई आणि इथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, महिला आणि सज्जन हो!!पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध केंद्राचा कोनशीला समारंभ संपन्न
April 19th, 03:48 pm
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या उपस्थितीत आज जामनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेचा कोनशीला समारंभ संपन्न झाला. जगभरातील अशा प्रकारचे हे जागतिक पातळीवरील पारंपरिक औषधांचे पहिले आणि एकमेव बाह्यस्थ केंद्र असणार आहे. हे केंद्र जागतिक स्वास्थ्यासाठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयाला येईल. बांगलादेश, भूतान, नेपाळ या देशांचे पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती यांनी पाठविलेले व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, सर्वानंद सोनोवाल, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यावेळी उपस्थित होते.उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
October 25th, 10:31 am
महात्मा बुद्धांच्या या पवित्र धरतीवर, सिद्धार्थनगर मध्ये मी आपल्या सर्वांना प्रणाम करतो! महात्मा बुद्धांच्या ज्या भूमीत आपल्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे घालवलीत, त्या भूमीवर, आज नऊ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन होत आहे. निरोगी भारतासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगर इथे 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे केले उद्घाटन
October 25th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगर इथे 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. सिद्धार्थनगर, इटाह, हरदोई, प्रतापगड, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर आणि जौनपूर इथे ही नवी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान पशुंच्या पाय, तोंड तसेच ब्रुसेलोसिससारख्या रोगांसाठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार
September 09th, 06:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2019 रोजी मथुरा येथे पशुंच्या पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस साठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम सुरु करणार आहेत.