
अंगोलाच्या राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 03rd, 01:00 pm
मी राष्ट्रपती लोरेंसू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 38 वर्षांनी अंगोलाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे केवळ भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती मिळत आहे, तर भारत आणि आफ्रिका यांच्यातील भागीदारीला देखील बळ मिळत आहे.
उपक्रमांची यादी: सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
April 04th, 02:32 pm
बिमस्टेक प्रदेशात स्थानिक चलनातील व्यापाराच्या शक्यतांवर व्यवहार्यता अभ्यास
6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 04th, 12:59 pm
सुरुवातीला, मी या शिखर परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल थायलंडच्या पंतप्रधान महामहिम शिनावात्रा आणि थायलंड सरकारचे मनापासून आभार मानतो.थायलंडमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
April 04th, 12:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडने आयोजित केलेल्या सहाव्या बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. शिखर परिषदेचा विषय होता - बिमस्टेक: समृद्ध, लवचिक आणि मुक्त क्षेत्र . ही शिखर परिषद म्हणजे नेत्यांच्या प्राधान्यक्रमांचे आणि बिमस्टेक प्रदेशातील लोकांच्या आकांक्षा तसेच जागतिक अनिश्चिततेच्या काळात सामायिक विकासाची सुनिश्चिती करण्यासाठी बिमस्टेकच्या प्रयत्नांचे द्योतक होते.अल्प मूल्याच्या भीम-यूपीआय व्यवहारांना(पी2एम) चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 19th, 04:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अल्प मूल्याच्या भीम-यूपीआय व्यक्ती ते व्यापारी (पी2एम ) व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला आज खालील स्वरुपात मंजुरी दिली.India-Mauritius Joint Vision for an Enhanced Strategic Partnership
March 12th, 02:13 pm
PM Modi, during his visit to Mauritius, held productive talks with PM Dr. Navinchandra Ramgoolam, reaffirming the deep-rooted ties between India and Mauritius, built on shared history, culture, and values. They acknowledged the growing Comprehensive Strategic Partnership across trade, infrastructure, climate, and healthcare, committed to fostering prosperity, sustainable development, and regional stability.Our vision for the Global South will go beyond SAGAR-it will be MAHASAGAR: PM Modi
March 12th, 12:30 pm
During his visit to Mauritius, PM Modi emphasized the deep-rooted ties between the two nations, announcing an 'Enhanced Strategic Partnership' with PM Ramgoolam. India will assist in building a new Parliament, modernizing infrastructure, and strengthening security. With a focus on digital innovation, trade, and cultural ties, PM Modi reaffirmed India’s commitment to regional growth and cooperation.NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.संयुक्त निवेदन: नवी दिल्ली येथे 28 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेली भारत-युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक
February 28th, 06:25 pm
भारत-युरोपीय महासंघ (ईयु) व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातर्फे या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. तर युरोपीय महासंघातर्फे तांत्रिक सार्वभौमत्व, सुरक्षा आणि लोकशाही विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष हेन्ना विर्कूनेन, व्यापार आणि आर्थिक सुरक्षितता, आंतर संस्थात्मक नातेसंबंध आणि पारदर्शकता विभाग आयुक्त मारोस सेफ्कोविक तसेच स्टार्ट अप्स, संशोधन आणि नवोन्मेष विभाग आयुक्त एकतेरीना झाहरिएवा यांनी ईयु बाजूने या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.पॅरीस इथे झालेल्या भारत -फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी मंच येथील पंतप्रधानांचे भाषण
February 12th, 12:45 am
राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ,भारत आणि फ्रान्समधले इथं उपस्थित असलेले उद्योजक सर्वांना माझा नमस्कार, बोजों!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत केलेले उद्घाटनपर भाषण
February 11th, 03:15 pm
जर तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट एआय ऍपवर अपलोड केला तर तो तुम्हाला साध्या भाषेत कोणत्याही अडचणीविना तुमच्या आरोग्याची माहिती समजावून सांगू शकतो. पण याच ऍपला जर तुम्ही एका अशा व्यक्तीचे चित्र काढायला सांगितले जी व्यक्ती तिच्या डाव्या हाताने लिहीत आहे तर बहुधा हे ऍप उजव्या हाताने लिहीणाऱ्या माणसाचे चित्र काढेल.याचे कारण म्हणजे ते पूर्णपणे याच ट्रेनिंग डेटावर आधारित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद
February 11th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका उच्च स्तरीय कार्यक्रमात तिचा समारोप झाला.इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
January 25th, 01:00 pm
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला मुख्य अतिथी देश होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी मी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात हार्दिक स्वागत करतो.जिनोम इंडियाप्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात पंतप्रधानांचे विचार
January 09th, 06:38 pm
आज भारताने संशोधनाच्या जगात एक अतिशय ऐतिहासिक पाऊल उचललेआहे. जीनोम इंडिया प्रकल्पाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, कोविडच्या आव्हानांना न जुमानता, आपल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. मला आनंद आहे की आयआयएससी, आयआयटी, सीएसआयआर आणि ब्रिक यांसारख्या देशातील 20 हूनअधिक आघाडीच्या संशोधन संस्थांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकल्पाचा डेटा, 10,000 भारतीयांचा जीनोम क्रम, आता भारतीय जैविक डेटा सेंटरमध्ये उपलब्ध आहे. मला विश्वास आहे की हा प्रकल्प जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो.जिनोम इंडिया प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
January 09th, 05:53 pm
जिनोम इंडिया प्रकल्पाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आज आपले विचार व्यक्त केले. भारताने संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जिनोम इंडिया प्रकल्पाला 5 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आपल्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे काम केले आणि कोविड महामारीने उभ्या केलेल्या आव्हानानंतरही हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला, असे ते म्हणाले.गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.पंतप्रधानांनी गयानाच्या राष्ट्राध्यक्षांशी अधिकृत चर्चा केली
November 21st, 04:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाऊनमधील सरकारी निवासात गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान आली यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी सरकारी निवासात आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष आली यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या सन्मानार्थ औपचारिक मानवंदन सोहोळा आयोजित केला.दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद
November 21st, 02:15 am
राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.