पंतप्रधान 28 आणि 29 डिसेंबर रोजी दिल्लीत मुख्य सचिवांच्या तिसर्‍या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार

December 26th, 10:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. अशा प्रकारची ही तिसरी परिषद आहे, पहिली परिषद जून 2022 मध्ये धर्मशाला येथे आणि दुसरी परिषद जानेवारी 2023 मध्ये दिल्लीत झाली होती.

Seventh meeting of Governing Council of NITI Aayog concludes

August 07th, 05:06 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today heralded the collective efforts of all the States in the spirit of cooperative federalism as the force that helped India emerge from the Covid pandemic.

पंतप्रधान भूषवणार 7 ऑगस्ट रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद

August 05th, 01:52 pm

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, राज्यांनी गतिमान , लवचिक आणि आत्मनिर्भर असण्याची आणि सहकारी संघराज्याच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारत'कडे वाटचाल करण्याची प्रबळ गरज आहे. एक स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्याच्या दिशेने,नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली असून ही बैठक केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश दरम्यानचे सहयोग आणि सहकार्याच्या नवीन युगाच्या दिशेने समन्वयाचा मार्ग मोकळा करेल.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली धरमशाला इथे 16 आणि 17 जून रोजी मुख्य सचिवांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

June 14th, 08:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हिमाचल प्रदेशात धरमशाला इथे एचपीसीए क्रीडांगणावर 16 आणि 17 जून रोजी मुख्य सचिवांची पहिली राष्ट्रीय परिषद होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

धरमशाला , हिमाचल प्रदेश येथे जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 07th, 04:04 pm

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, मुख्यमंत्री जयराम ठाकूरजी, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद पटेलजी, अनुराग ठाकुरजी, नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमारजी, यूएईचे भारतातील राजदूत डॉक्टर अहमद अलबाना, उद्योग जगतातील दिग्गज उद्योगपती, येथे उपस्थित अन्य मान्यवर आणि माझे प्रिय सहकारी. धरमशाला येथे जागतिक गुंतवणूकदार परिषद ही कल्पना नाही, सत्य आहे, अभूतपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे. तुमचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशाचा साऱ्या देशाला, साऱ्या जगाला हा दावा आहे की आम्ही आता तयार आहोत.

धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

November 07th, 11:22 am

उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे.