संचालक आणि उपसचिवांबरोबर पंतप्रधानांचा संवाद

October 18th, 02:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 380 संचालक आणि उपसचिवांबरोबर संवाद साधला. ऑक्टोबर महिन्यातल्या विविध दिवशी चार गटात त्यांनी संवाद साधला. यातील शेवटचा संवाद 17 ऑक्टोबरला झाला. सुमारे दोन तास हा संवाद चालायचा.