केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो टप्पा-IV प्रकल्पाच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी दिली

December 06th, 08:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या टप्पा - IV प्रकल्पाच्या रिठाला - नरेला - नाथुपूर (कुंडली) या 26.463 किलोमीटर कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे,ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी आणि शेजारील हरियाणा यांच्यातील संचारसंपर्क आणखी वाढेल.हा कॉरिडॉर मंजूर झाल्यापासून 4 वर्षात पूर्ण होणार आहे.

दिल्लीची प्रगती होत असल्याचे दिसत असताना, इंडी आघाडी त्याचा सत्यानाश करण्यासाठी झटत आहे: पंतप्रधान मोदी ईशान्य दिल्लीतील सभेत

May 18th, 07:00 pm

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रचार सभांच्या धडाक्यात, आज प्रथमच ईशान्य दिल्लीत झालेल्या उत्साही सभेला संबोधित केले. त्यांनी उज्ज्वल भविष्याचे वचन देत आणि राजधानी म्हणून देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात दिल्लीने पुढे राहण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली

ईशान्य दिल्लीतील उत्साही प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण

May 18th, 06:30 pm

पंतप्रधान मोदींनी आपल्या एका पाठोपाठ सुरू असलेल्या प्रचार सभांच्या सत्रात, आज प्रथमच ईशान्य दिल्लीतील उत्साहाने जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी. त्यांनी उज्ज्वल भविष्याचे वचन दिले आणि राजधानी म्हणून दिल्ली देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात अग्रस्थानी असण्याची गरज स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमध्ये पीएम-स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना करणार संबोधित

March 13th, 07:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमधील जेएलएन स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. यावेळी ते दिल्लीमधील रस्त्यावरील 5,000 विक्रेत्यांसह (एसव्ही) 1 लाख एसव्हींना योजनेंतर्गत कर्जाचे वितरण देखील करतील.

दिल्ली मेट्रो फेज-IV प्रकल्पाच्या लाजपत नगर ते साकेत जी-ब्लॉक आणि इंद्रलोक ते इंद्रप्रस्थ या दोन कॉरिडॉरना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

March 13th, 03:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या फेज-4 प्रकल्पाच्या दोन नवीन कॉरिडॉरना (मार्गिका) मंजुरी दिली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीतील मेट्रो सेवेच्या संपर्कव्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.