'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.अमेरिकेने भारताला 297 प्राचीन कलाकृती परत केल्या
September 22nd, 12:11 pm
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यवहार ब्युरो यांनी उभय देशांमधील घनिष्ठ द्विपक्षीय संबंध कायम राखण्यासाठी आणि उत्तम सांस्कृतिक समज वाढवण्याच्या उद्देशाने जुलै 2024 मध्ये सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली होती. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी अध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली वचनबद्धता पूर्ण करणे हा यामागचा उद्देश असून जून 2023 मधील त्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ते प्रतिबिंबित होते.Fact Sheet: 2024 Quad Leaders’ Summit
September 22nd, 12:06 pm
President Biden hosted the fourth Quad Leaders’ Summit with leaders from Australia, Japan, and India in Wilmington, Delaware. The Quad continues to be a global force for good, delivering projects across the Indo-Pacific to address pandemics, natural disasters, maritime security, infrastructure, technology, and climate change. The leaders announced new initiatives to deepen cooperation and ensure long-term impact, with commitments to secure robust funding and promote interparliamentary exchanges. Quad Commerce and Industry ministers are set to meet for the first time in the coming months.The Wilmington Declaration Joint Statement from the Leaders of Australia, India, Japan, and the United States
September 22nd, 11:51 am
PM Modi joined leaders from the U.S., Australia, and Japan for the fourth Quad Leaders Summit in Wilmington, Delaware. The Quad reaffirmed its commitment to a free, open, and inclusive Indo-Pacific, opposing destabilizing actions and supporting regional peace, security, and sustainable development. The leaders emphasized respect for international law, democratic values, and regional institutions like ASEAN and the Pacific Islands Forum.पंतप्रधान मोदींचे न्यूयॉर्कमध्ये आगमन
September 22nd, 11:19 am
डेलावेअर येथील सुफळ क्वाड लीडर्स समिट आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. ते शहरात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून त्यामध्ये भारतीय समुदायाचा कार्यक्रम आणि 'समिट ऑफ द फ्यूचर' चा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत भेट
September 22nd, 07:16 am
अमेरिकेत विलमिंग्टन येथे 6 व्या क्वाड शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माननीय महोदय अँथनी अल्बानीज यांनी भेट घेतली. मे 2022 पासून हा त्यांचा व्यक्तिगत स्वरूपातला नववा संवाद होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट
September 22nd, 06:01 am
क्वाड शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकेत डेलावेर मधील विलमिंग्टन येथे जपानचे पंतप्रधान माननीय महोदय फुमियो किशिदा यांची भेट घेतली.अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
September 22nd, 05:21 am
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यजमान देश म्हणून ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल तसेच जागतिक कल्याणासाठी एक शक्ती म्हणून क्वाडला बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून आभार मानले. सद्यस्थितीत जग तणाव आणि संघर्षांने व्यापलेले आहे, अशावेळी सामायिक लोकशाही मूल्ये आणि तत्वांना अनुसरून क्वाड समूह देशांनी एकत्र येणे मानवतेसाठी महत्वाचे असल्याची बाबही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली. क्वाड संघटना ही कायमच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत तसेच जागतिक पातळीवरील वादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरूनच नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाटचाल करत आली असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनात ठळकपणे अधोरेखित केली. स्वतंत्र, मुक्त, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हे क्वाड समूहाच्या सदस्य देशांचे परस्पर सामायिक उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी क्वाड ही संघटना कायम उपलब्ध असेल, परस्परांना सहकार्य करत राहील, तसेच भागीदारीच्या प्रयत्नांमध्येही सहभागी असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची त्यांच्या डेलावेर मधील विलमिंग्टन निवासस्थानी घेतली भेट
September 22nd, 02:02 am
अमेरिकेत सुरु असलेल्या क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची भेट घेतली. या भेटीला खास स्वरुप देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी विलमिंग्टन इथल्या आपल्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन केले होते.